फॅनी खान नंतर ऐश्वर्या राय लवकरच बीग बजेट 'चित्रपटात' दिसणार

बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) तिच्या पुढच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे.
Aishwarya Rai Bachchan upcoming movie Ponniyin Selvan
Aishwarya Rai Bachchan upcoming movie Ponniyin SelvanDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) तिच्या पुढच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. ऐश्वर्या रायचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून या पोस्टरला जबरदस्त प्रतिसाद देखील मिळत आहे. ऐश्वर्या राय अखेर 2018 मध्ये 'फॅनी खान' या चित्रपटात दिसली होती. ऐश्वर्या रायच्या या चित्रपटाचे नाव आहे 'पोन्नीईन सेल्वान' (Ponniyin Selvan) जे एक ऐतिहासिक ड्रामा आहे. ऐश्वर्या रायचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.(Aishwarya Rai's Ponnein Selvan movies first look has been released)

Aishwarya Rai Bachchan upcoming movie Ponniyin Selvan
Raj Kundra ने 'या' अभिनेत्रीकडे न्यूड ऑडिशनसाठी केली होती मागणी

ऐश्वर्या राय बच्चनच्या 'पोन्नीईन सेल्वान' चित्रपटाचे मणिरत्नम हे दिग्दर्शित आहेत. हा चित्रपट मणिरत्नमच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. तो बर्‍याच दिवसांपासून या चित्रपटावर काम करत असून त्याचे बजेट सुमारे 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे, हा चित्रपट सर्वात महागड्या तामिळ चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होईल आणि त्याचा पहिला भाग 2022 मध्ये येईल. या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत विक्रम, कार्ती, जयम रवि, त्रिशा कृष्णन आणि मोहन बाबू दिसणार आहेत.

ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आणि लिहिले की, 'सुवर्णकाळ जिवंत होणार आहे. मणिरत्नमचे पोन्निन सेल्वान. ऐश्वर्याच्या या घोषणेनंतर तिचे चाहते खूप उत्साही आहेत आणि एका चाहत्याने लिहिले आहे की, 'खूप आतुरतेने वाट पहात आहे.' अशाप्रकारे ऐश्वर्या रायला भव्य स्टाईलमध्ये पाहणे खूप मजेदार असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com