राहुलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लग्नाची तारीख जाहीर केली आहे. Twitter/@CricBollyBuzz
मनोरंजन

आनंदाची बातमी ! दिशा -राहुल वैद्य अडकणार लग्नबेडीत

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) फेम राहुल वैद्यने (Rahul Vaidya) अखेर आपल्या चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) फेम राहुल वैद्यने (Rahul Vaidya) अखेर आपल्या चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. तो त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारशी (Disha Parmar) लग्न करणार आहे. राहुलने सोशल मीडियावर (social media) पोस्ट शेअर करुन लग्नाची तारीख जाहीर केली आहे. ज्यानंतर राहुल आणि दिशा यांचे चाहते खूप आनंदित आहेत. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे.(Rahul Vaidya Disha Parmar announced the date of marriage)

राहुल आणि दिशा 16 जुलै रोजी लग्न करणार आहेत. राहुलने लिहिले आहे की- आमच्या परिवाराच्या आशीर्वादाने, हा खास क्षण तुमच्याबरोबर शेयर करण्यात आम्हाला आनंद आहे. आम्ही 16 जुलै 2021 रोजी गाठ बांधणार आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि प्रार्थनाची गरज आहे. आम्ही एकत्र नवीन अध्याय सुरू करणार आहोत. हे पोस्ट शेअर करत राहुलने लिहिले - #TheDisHulWedding

राहुलच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंटद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. राहुलसोबत खतरों के खिलाडी 11 चा भाग बनलेल्या वरुण सूदने लिहिले- ‘वाह.. हॅपी.’ तर दिव्यांका त्रिपाठीने कमेंट केली -‘राहुल शुभेच्छा.’ लग्नाविषयी बोलताना राहुलने एका मुलाखतीत म्हटले आहे की दिशा आणि मला नेहमीच काही लोकांच्या उपस्थितीत माझे लग्न करायचे होते. आमच्या प्रियजनांनी आम्हाला या विशेष दिवशी आशीर्वाद द्यावा अशी आमच्या दोघांची इच्छा होती. हे विवाह वैदिक विधीनुसार केले जाईल, गुरबानी शबद सेरेमनी देखील होणार आहे.

तुम्हाला माहित आहे का राहुल वैद्यने नॅशनल टेलिव्हिजनवर बिग बॉस 14 या शोमध्ये दिशाला प्रपोज केले होते. त्याने आपल्या टी-शर्टवर लिपस्टिकसह लिहिले होते - हॅपी बर्थडे दिशा 'मैरी मी' दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुलने हे केले. दिशा राहुलच्या प्रस्तावाला काहीच बोलू शकली नाही आणि तिनेही या लग्नाला होकार दिला. व्हॅलेंटाईन डेनिमित्त राहुलच्या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी दिशा बिग बॉसमध्ये आली होती. त्यानंतर राहुलच्या आनंदासाठी जागा नव्हती. शो नंतर दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसले होते. राहुल आणि दिशा देखील एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले होते. जी चाहत्यांना खूप आवडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Davorlim: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

Goa Opinion: गोव्यात मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी निष्पक्षपणे मिळतील, तेव्हा ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल

SCROLL FOR NEXT