राखी चक्क देवाला तक्रार करत म्हणाली...

बॉलिवूडची (Bollywood) ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या अतरंगी साहसांमुळे सोशल मीडियावर (Social media) नेहमीच चर्चेत असते.
Dancer Rakhi Sawant
Dancer Rakhi SawantTwitter/@BollywoodSociet
Published on
Updated on

बॉलिवूडची (Bollywood) ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या अतरंगी साहसांमुळे सोशल मीडियावर (Social media) नेहमीच चर्चेत असते. कधीकधी ती असे विधान देते जे प्रचंड व्हायरल होते. तर काहीवेळा ती शोपूर्वी विजेत्यांची नावे घोषित करते. सोशल मीडियावर बर्‍याचदा तिचे मजेदार व्हिडिओ पाहिले जातात. तिचा आणखी एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती देवाकडे तक्रार करत असल्याचे दिसून आले आहे. राखी या व्हिडिओमध्ये म्हणते की, देवा तू रोज एक लाख चाहते देतोस, पण ते एक लाख फॅन्स माझ्या इंस्टाग्रामला (Instagram) लाईक का नाही करत. राखीचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(Rakhi Sawant has a complaint with God)

Dancer Rakhi Sawant
Chura Ke Dil Mera 2.0: शिल्पा शेट्टी करत आहे अक्षय कुमार ला मिस

राखी सावंतने तिचा हा गमतीदार व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की राखी काही पत्रकारांशी बोलत आहे, मग अचानक ती देवाकडे पहात तक्रारी करण्यास सुरवात करते. राखी म्हणाली, 'अरे देवा, तू मला रोज एक लाख चाहते देतो, पण हे एक लाख फॅन्स माझ्या इन्स्टाग्रामला लाईक का नाही करत. राखीने या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'सर्जनशीलता ही माझ्या चाहत्यांची मागणी आहे, म्हणून मी येथे तुमच्यासाठी संपूर्ण मसाला तडका घेऊन आले आहे , आशा आहे की तुम्हाला सर्वांना पुन्हा आवडेल'. राखी सावंतचा हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

राखी सावंतचा हा व्हिडिओ आतापर्यंत 157 हजार वेळा पाहिला गेला आहे, त्यासोबत 420 कमेंट्स देखील यावर आल्या आहेत. राखीच्या कामाबद्दल बोलत असताना, अलीकडेच तिचे 'ड्रीम में एंट्री' (Dream Mein Entry) हे लेटेस्ट गाणे प्रसिद्ध झाले आहे, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. राखीच्या या गाण्यावर बरेच डान्स व्हिडिओ बनवले जात आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. राखीच्या या गाण्याला एकाच वेळी 10 दशलक्षाहून अधिक व्यूज मिळाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com