Raghav - Parineeti Love Story Dainik Gomantak
मनोरंजन

Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement : शूटिंगदरम्यान भेटले अन् प्रेमात पडले; परिणिती- राघव यांच्या 'शुद्ध देसी रोमान्स'ची स्टोरी..

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या गुलाबी नात्याचा प्रवास असा झाला.

Rahul sadolikar

सध्या मनोरंजन विश्वात राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्राच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नेता आणि अभिनेत्रीचा हा गुलाबी प्रवास गेले काही दिवसांपासुन चर्चेचा विषय बनलाय. आज संध्याकाळी राघव आणि परिणिती दोघे साखरपुड्याचे विधी पार पाडतील.

यानिमीत्ताने परिणितीचे वांद्य्रातले घर सजले आहे. तर दिल्लीत दोघांचा साखरपुडा होणार असल्याने तिथेही सोहळ्याची धामधूम सुरू आहे. पण या रेशीमगाठी जुळल्या कशा? चला पाहुया.

दोघांची भेट कुठे झाली आणि कसे जुळले बंध याची दोघांच्याही चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. आत्तापर्यंत परिणिती आणि राघव यांच्यापैंकी कोणीही आपल्या नात्याबद्दल कुठेही खुलासा केलेला नाही परंतु ते अनेकदा स्पॉट झालेले आहेत. नुकतेच ते मोहली क्रिकेट स्टेडियमला आयपीएल पाहण्यासाठी एकत्र दिसले होते. 

दोन महिन्यांपूर्वीच राघव - परिणिती एका ठिकाणी स्पॉट झाले होते तेव्हाच सोशल मिडीयावर या नात्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. पण दोघांच्या नात्याविषयी कुठलीच अधिकृत माहिती मिळत नव्हती. पण त्यांच्या नात्याची सुरूवात कुठून झाली ते पाहुया. सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत असताना लव्हस्टोरीची सुरूवात कशी झाली ते पाहुया.

परिणिती आणि राघव चड्ढा एकमेकांना कॉलेजपासून ओळखत असल्याची माहिती मिळतेय. दोघे परदेशातही एकत्र शिक्षण घेते होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते दोघं एकत्र होते आणि तेव्हापासून ते एकमेकांचे मित्र होते असे कळते आहे. राघव- परिणितीच्या नात्याची सुरूवात नेमकी कधी झाली? हे सांगता येत नसले तरी रेशमी बंध जुळण्याची सुरूवात परदेशातल्या त्यांच्या शिक्षणापासुन झाली असं म्हणता येईल.पण राघव चढ्ढा जेव्हा पंजाबच्या दौऱ्यावर होते तेव्हा परिणितीचं शूटही तिथेच सुरू होतं, याचवेळी दोघांनी एकमेकांना पसंत केलं अशीही चर्चा आहे.

म्हणजेच नात्याची ओझरती सुरूवात तिथुन झाली असं म्हणता येईल. राघव चढ्ढांच्या एकुण करिअरचा विचार करता त्यांनी सुरूवातीला सीए म्हणुन आपल्या करिअर केले. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांच्या करिअर आणि अनुभवाचा विचार करता त्यांना पक्षाचे कोषाध्यक्ष बनवण्यात आले.

त्यानंतर दोघे भारतात परतले आणि परिणिती अभिनयाकडे वळली तर राघव चढ्ढा यांनी राजकारणाच्या माध्यमातून आपल्या करिअरला सुरूवात केली. काही दिवसांपासुन दोघे वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होतायत त्यावरुनच त्यांच्या नात्यातल्या चर्चांना उधाण आले होते.

दोघांनी यावर बोलणं पूर्णत: टाळलं होतं. गेले काही दिवस ही सगळी चर्चा सुरू असताना आता दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज संध्याकाळी साखरपुड्याचा हा सोहळा पार पडत आहे. अजुनतरी विवाह सोहळ्याची तारीख कळू शकली नसली तरी साखरपुडा पार पाडल्यानंतर नक्कीच परिणिती आणि राघव यांच्या बोहल्यावर चढण्याची तारीख दोघांच्या चाहत्यांना समजू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT