Eliana De Cruze pregnancy : लग्नाचं सोडा ओ ! बेबी बंप मिरवता आलं पाहिजे,इलियाना डिक्रूजचा व्हायरल फोटो पाहाच

अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा बेबी बंप दाखवताना एक फोटो व्हायरल होत आहे.
Eliana De Cruze pregnancy
Eliana De Cruze pregnancyDainik Gomantak

मनोरंजन विश्वात सध्या अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या प्रेग्नंसीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अशा वेळी तिच्या चाहत्यांना याबद्दल प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. बॉलीवूडच्या तारका आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य याविषयी त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते.

आपली आवडती अभिनेत्री काय करते, तिच्या घरात सगळे आलबेल सुरु आहे ना अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना हवी असतात. सध्या बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि तिचे बेबी बंप फोटोशूट हा चर्चेचा विषय आहे.

अभिनेत्री इलियान डिक्रुझ ही तिच्या बेबी बंप फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. ती आता आई होणार आहे. यापूर्वीच्या तिच्या एका पोस्टमधून तिनं प्रेग्नंट असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला होता. खरंतर इलियानं लग्न केल्याचे अधिकृतपणे चाहत्यांना न सांगितल्यानं चाहत्यांनी तिच्या त्या पोस्टवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचं कौतूक केलं आहे तर अनेकांनी तिला लग्नावरुन प्रश्न विचारले आहे.

आता तिनं बेबी बंप फोटोशुटचे काही फोटो शेयर केले असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तिनं हाय स्लिट स्लिव्हलेस ब्लॅक कलरच्या गाऊनमधील फोटो शेयर केला आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इलियानाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगून जाणारे आहेत. प्रेग्नसीमुळे तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो चाहत्यांच्या कमेंट्सचा विषय बनलाय.

Eliana De Cruze pregnancy
Parineeti-Raghav Engagement: परिणीती-राघवच्या साखरपुड्याची तयारी सुरू, पाहा व्हायरल व्हिडिओ

इलियानं तिनं हे फोटो शेयर करुन बाकी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. ते फोटो शेयर करताना इलियानं लिहिलं आहे की, बंप अलर्ट, याशिवाय तिनं चाहत्यांचे आभारही मानले आहे. इलियाला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतूकही केलं आहे. त्यामध्ये अथिया शेट्टी, सोफी चौधरी, शिवानी दांडेकर या नावाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com