Parineeti Chopra - Raghav Chadhha Wedding : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असणारे परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्न आज उदयपूरच्या शाही पॅलेसमध्ये पार पडणार आहे. या लग्नसोहळ्याला व्हीआयपी पाहुणे उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार लग्नासाठी सगळ्यात आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं आगमन झालं.
अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्यासह आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हे देखील वराच्या बाजूने आलेल्या पाहुण्यांमध्ये सहभागी झाले होते.
दरम्यान, परिणीतीची चुलत बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा अजूनही अमेरिकेत आहे. ती किंवा तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती उपस्थित नव्हते.
दोघेही या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. पण प्रियांकाने लाडक्या बहिणीला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत.
परिणीती आणि राघव अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि मे महिन्यात राघवच्या दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती. त्यासाठी प्रियांका दिल्लीला रवाना झाली होती. तिने वधूच्या बहिणीसाठी ठेवलेल्या विधींमध्येही भाग घेतला.
टेनिस चॅम्पियन सानिया मिर्झा बहीण अनम मिर्झासोबत 24 सप्टेंबरला परिणीती चोप्राच्या लग्नासाठी उदयपूरला पोहोचली.
गायक नवराज हंस यांनी रविवारी उदयपूर येथील महाराणा प्रताप विमानतळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला.
हंस यांनी शनिवारी 90 च्या थीम पार्टीमध्ये परफॉर्म केले आणि हेही सांगितले की परिणीती, राघव आणि पाहुणे 2.5-3 तास नाचले.
डिझायनर मनीष मल्होत्रा रविवारी सकाळी उदयपूरमध्ये परिणीती चोप्राच्या लग्नासाठी पोहोचताना दिसला. त्याने तिच्या लग्नाचा पेहराव डिझाइन केला आहे.
या लग्नात क्रिकेटर हरभजन सिंग पत्नी गीता बसेरा आणि मुलांसह पाहुण्यांचा सहभागी होणार आहे . ते रविवारी सकाळी उदयपूरला रवाना झाले.
डीजे सुमित सेठी शनिवारी संध्याकाळी उदयपूरला पोहोचला होता. शनिवारी 90 च्या दशकातील थीम पार्टीमध्ये झालेल्या सर्व मौजमजेचा इशारा देताना, त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, “काय रात्र आहे” आणि परिणिती आणि राघवच्या लग्नाला 'वर्षातील सर्वात मोठे लग्न' असे म्हटले आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला थोड्याच सुरुवात झालेलीच आहे. अनेक राजकिय नेत्यांसोबतच आता आदित्य ठाकरे परिणीती आणि राघवच्या लग्नासाठी उदयपूरला पोहोचले आहेत.
उदयपूर एअरपोर्टवर पोहोचताच मिडीयाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आज राजनीती नाही तर राघनीती आहे. मला खुप आनंद होतोय, या दोघांना लग्नासाठी शुभेच्छा".
परिणीती चोप्राचे दोन्ही भाऊ बहिणीच्या लग्नकार्यात पुढाकार घेताना दिसले. परिणिताचे दोन्ही भाऊ पाहुण्यांसोबत संवाद साधताना दिसले. परिणीती चोप्राला सहज चोप्रा आणि शिवांग चोप्रा असे दोन भाऊ आहेत. एक भाऊ मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहे तर धाकटा शिवांग डॉक्टर आहे.
परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. फोटो सेशन चालू आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून वधू-वरांची छायाचित्रे क्लिक करण्यात येत आहेत. निरोपाचे गाणे चालू आहे. 'धडकन' चित्रपटातील 'दुल्हे का सेहरा' हे गाणे वाजत आहे.
बहुप्रतिक्षित राघव-परिणितीचं लग्न संपन्न झालं असून नवविवाहित जोडपे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरू झाली आहे. रात्री 8.30 च्या सुमारास याची सुरुवात होईल, ज्यामध्ये अनेक नेत्यांशिवाय बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी होतील.