Disha Patani Dainik Gomantak
मनोरंजन

Project K: दिशा पटानी, प्रभास, बीग बी अन् डिंपल क्विन दीपिका दिसणार एकत्र

अभिनेत्री दिशा पटानी 'प्रोजेक्ट के' मध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि प्रभास यांच्यासोबत मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) 'प्रोजेक्ट के' मध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि प्रभास (Prabhas) यांच्यासोबत मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. या संदर्भात शनिवारी रात्री, दिशाने इंस्टाग्रामवर 'प्रोजेक्ट के' च्या टीमकडून तिला मिळालेल्या फुलांचे आणि गिफ्ट हॅम्परचे फोटोज शेयर केले आहेत. टीमने तिला 'प्रोजेक्ट के' च्या टीममध्ये स्वागत करण्यासाठी चिठ्ठी देखील पाठवली ज्यामध्ये लिहिले होते, "दिशाचे स्वागत आहे, प्रोजेक्ट के तुमचे स्वागत करते आहे! ह्या प्रोजेक्ट मध्ये एकत्र काम करताना आम्‍हाला आनंद होत आहे.” (Project K Disha Patani Prabhas Big B and Dimple Queen Deepika will be seen together)

दिशाने शेयर केलेल्या फोटोमध्ये लाल हार्ट इमोजीची एक स्ट्रिंग देखील जोडली आहे. 'प्रोजेक्ट के' हा मेगा-बजेट साय-फाय थ्रिलर म्हणून चाहत्यांमध्ये ओळखला जातो, ज्याचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. युवा स्टार प्रभास लोफर आणि एमएस धोनी फेम दिशा पटानी सोबत प्रोजेक्ट के मध्ये सामील होणार आहे आणि ती नाग अश्विनच्या मॅग्नम ओपसमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. प्रोजेक्ट के मध्ये प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहेत.

दुसरीकडे प्रभासने आणखी काही प्रोजेक्ट मध्ये काम करत आहे. तो KGF 2 फेम प्रशांत नील दिग्दर्शित श्रुती हासन सह अभिनीत अॅक्शन ड्रामा 'सलार' मध्ये दिसून येणार आहे. तसेच तो पुढे ओम राऊतच्या मॅग्नम ऑपस आदिपुरुषमध्ये देखील दिसणार आहे, जो 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. क्रिती सॅनन, सनी सिंग आणि सैफ अली खान देखील या चित्रपटाचा भाग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT