Priyanka chopra karan johar controversy Dainik Gomantak
मनोरंजन

'आता आपल्या लायकीत रहा', जेव्हा करणने प्रियंकाला दिला होता सल्ला

प्रियांका चोप्रा आता एक जागतिक आयकॉन आहे, जिने आपल्या कामाने केवळ देशातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) आता एक जागतिक आयकॉन आहे, जिने आपल्या कामाने केवळ देशातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. बॉलीवूडसोबतच प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्येही (Hollywood) खूप सक्रिय आहे आणि सर्वांनाच याची जाणीव आहे. बॉलीवूडवर राज्य केल्यानंतर प्रियांका चोप्रा हॉलिवूडकडे वळली आणि आता तिने इंडस्ट्रीत चांगलाच ठसा उमटवला आहे. प्रियांका चोप्रा तिच्या कामासोबतच काही वादांमुळेही चर्चेत असते. असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याशी प्रियांका चोप्राचे चांगले संबंध आहेत, परंतु काहींसोबत तिची भांडणेही झाली होती. यामध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) नावाचा समावेश आहे.

तर ही चर्चा 2017 ची आहे, जेव्हा प्रियांका चोप्रा करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणमध्ये पोहोचली होती. येथे, करणने प्रियांका चोप्रावर एक टिप्पणी केली, ज्याने केवळ 'देसी गर्ल' म्हणजेच प्रियंकाच नाही तर तिचे सर्व चाहते आश्चर्यचकित झाले. त्याच्या या कमेंटमुळे करण प्रियंका चोप्राच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ शेअर करताना अनेक यूजर्सनी त्याच्यावर कमेंट्स केल्या.

रॅपिड फायर राउंडबद्दल बोलत असताना, करण जोहर प्रियांकाला म्हणाला- 'आम्ही तुझ्या हॉलिवूडमधील कामगिरीबद्दल ऐकले आहे. तू प्रत्येक रेड कार्पेटचा, प्रत्येक टॉक शोचा भाग होतीस. आता तु इथे आल्यावर खरी मजा सुरू झाली आहे. म्हणूनच आम्ही तुला सोफ्यावर बोलावलं आहे.'

करण जोहर-प्रियांका चोप्राचा संपर्क तुटला होता

करण जोहर पुढे म्हणाला- 'तुझं खूप कौतुक झालं. तुझे जागतिक यश पुरेसे आहे. हिंदी चित्रपट अभिनेत्री व्हा, आता आपल्या लायकीत रहा.' करणच्या या वक्तव्यानंतर दोघांमधील संवाद थांबल्याच्या बातम्याही आल्या होत्या. दोघांमधील कटुता इतकी वाढली होती की, दोघेही बराच वेळ एकमेकांशी संपर्कात नव्हते. मात्र, नंतर दोघे पुन्हा चांगले मित्र बनले. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरनेही यावर प्रतिक्रिया दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT