तंबाखू ब्रँडची जाहिरात फी परत न केल्याबद्दल अक्षय कुमार होतोय ट्रोल

अक्षय कुमारच्या तंबाखूच्या ब्रँडसाठी बनवलेल्या जाहिरातीवरून गदारोळ झाला होता. आता अभिनेत्याच्या माफीवरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Akshay Kumar
Akshay Kumar dainik gomantak
Published on
Updated on

अक्षय कुमारच्या तंबाखूच्या ब्रँडसाठी बनवलेल्या जाहिरातीवरून गदारोळ झाला होता. आता अभिनेत्याच्या माफीवरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खिलाडी कुमारने या जाहिरातीसाठी घेतलेली रक्कम परत न केल्याबद्दल युजर्सनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी शुल्क परत करावे आणि जाहिरातीचे प्रसारण बंद करावे, असे लोकांचे म्हणणे आहे.

(Akshay Kumar Troll for non-refund of tobacco brand advertising fee)

Akshay Kumar
मिस्टर परफेक्शनिस्ट चाहत्यांना देणार गूड न्यूज, ''IPL मध्ये संधी आहे का?''

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात करून अडचणीत सापडला आहे. त्‍यामुळे ऑन एअर अॅड आल्‍यानंतर तो प्रचंड ट्रोल झाला, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर चाहत्यांची माफी मागितली. पण आता तर हद्द अशी झाली आहे की युजर्स खिलाडी कुमारला माफी मागितल्याने ट्रोलही करत आहेत.

अक्षय कुमार शुल्क परत करणार का?

खिलाडी अक्षय कुमारचा हा माफीनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकजण खिल्ली उडवताना दिसले. लोक म्हणतात शेवटच्या वेळी बोल, जुबान केसरी. त्यामुळे अक्षय कुमारने एंडोर्समेंट फी परत न केल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अक्षय कुमारने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, विमल वेलची अॅडसाठी मिळालेले शुल्क तो चांगल्या कारणांसाठी वापरणार आहे. म्हणजे फी दान केली जाईल. कराराचा कायदेशीर कालावधी संपेपर्यंत ब्रँड जाहिराती ऑन एअर ठेवू शकतात, असेही त्यात म्हटले आहे.

तथापि, काही लोक आहेत ज्यांनी तंबाखू ब्रँडशी संबंध संपवल्याबद्दल अभिनेत्याचे कौतुक केले आहे. त्यांनी अक्षय कुमारच्या निर्णयाचा आदर केला आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की काहीही झाले तरी ते त्याच्यासोबत आहेत.

अक्षय कुमारने माफीनाम्यात काय लिहिले?

अक्षय कुमारने आपल्या माफीनाम्यात लिहिले - मला माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागायची आहे. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रभावित केले आहे. मी तंबाखूला कधीही मान्यता दिली नाही आणि देणारही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com