Priyanka Chopra Dainik Gomantak
मनोरंजन

प्रियंका चोप्राची मुलगी झाली 'देसी गर्ल'; शेअर केला मालतीचा फोटो

प्रियांका चोप्रा आई झाल्यापासून तिच्यामुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दैनिक गोमन्तक

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाल्यापासून तिच्यामुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रियांका आणि निक जोनासने एक-दोनदा त्यांच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे पण त्यामध्ये तिचा चेहरा लपवला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला स्वत: प्रियांकाने सोशल मीडियावर सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुलीच्या जन्माची माहिती देऊन चाहत्यांना खूश केले होते, मात्र अद्याप तिचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. पण सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर करून मुलीचा चेहरा जवळपास दाखवण्यात आला आहे. (Priyanka Chopra daughter becomes Desi Girl Malti photo shared)

बॉलीवूड-हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, जी देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे, तिला देखील समजते की चाहते तिची मुलगी मेरी मालतीला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यामुळेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या मुलीचा क्लोजअप फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे टी-शर्टवर 'देसी गर्ल' असे लिहिले आहे.

प्रियांकाने शेअर केला क्लोजअप फोटो

जेव्हा प्रियंका चोप्राने देसी स्टाईलमध्ये आपल्या मुलीचे नाव मालती ठेवले, तेव्हाही तिची खूप चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा आपल्या मुलीची झलक दाखवत, मालती देसी असल्याचे सांगितले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये मालतीला कोणीतरी पकडून ठेवलेले दिसत आहे, मात्र हा फोटो इतका जवळून काढण्यात आला आहे की संपूर्ण चेहरा दिसून येत नाही. मुलीचा फोटो शेअर करत 'देसी गर्ल' असा हॅशटॅग देखील प्रियंकाने लिहिला आहे.

मालतीला पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल

प्रियांका चोप्राने यावेळीही तिच्या मुलीचा पूर्ण चेहरा दाखवलेला नाहीये. दरम्यान प्रियांका आणि निक जोनासने मदर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर आपल्या मुलीची ओळख करून दिली. जन्मानंतर मालती सुमारे 100 दिवस एनआयसीयूमध्ये राहिली आहे. अनेक सेलिब्रिटींप्रमाणे प्रियांकानेही तिची छोटी मालती मेरी चोप्रा जोनासला जगापासून दूर ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी तिची आई डॉ. मधु मालती चोप्रा यांनी मालतीच्या पहिल्या वाढदिवसाला तिचा चेहरा दाखवण्याचे संकेत देखील दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT