बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने INS विशाखापट्टणमध्ये जाऊन भारतीय नौदलाच्या जवानांची भेट घेतली आहे. सैनिकांसोबतचे सलमानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सलमाननं भारतीय सैनिकांसोबत संवाद साधला आहे.
तसेच त्यांने INS विशाखापट्टणम ही युद्धनौका पाहिली. तसेच त्यानं यावेळी सैनिकांसोबत पुशअप्स मारले, कूकिंग केलं आणि वर्कआऊट देखील केला. सलमाननं INS विशाखापट्टणमवर तिरंगा फडकवला. सैनिकांनी सलमानचा ऑटोग्राफ देखील घेतला. सैनिकांची देशभक्ती आणि धैर्य पाहून सलमान भारावून गेला.
आयएनएस विशाखापट्टनम माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. आयएनएस विशाखापट्टनम 163 मीटर लांब आणि 7400 टन वजनाची आहे. यामध्ये सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची 76 एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. आता भारतीय नौदलात (Indian Navy) 130 युद्ध नौका आहेत. विशाखापट्टणम या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर 249 ए स्टीलचा वापर करून केली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे.
लवकरच सलमानचे काही आगामी चित्रपट (Movie) हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'कभी ईद कभी दिवाली', 'टायगर-3' या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत.
'टायगर-3' (Tiger-3) हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच सलमान बिग बॉसच्या (Big Boss) नव्या सिझनला होस्ट करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.