Priyanka Chopra And Nick Jonas  Instagram/@priyankachopra
मनोरंजन

प्रियांका-निकच्या मुलीचे नामकरण, नावात भारतीय- पाश्चीमात्य झलक

प्रियांका आणि निकने 21 जानेवारी रोजी आपल्या मुलीचे स्वागत केल्याची आनंदाची बातमी दिली

दैनिक गोमन्तक

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केले की त्यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. मात्र त्यावेळी या दोघांनीही त्यांच्या घोषणेमध्ये त्यांना मुलगा आहे की मुलगी याची कोणतीही माहिती दिली नव्हती. परंतु नंतर हे उघड झाले की दोघेही एका मुलीचे पालक बनले आहेत. या चिमुकलीचे स्वागत केल्यानंतर तीन महिन्यांनी, TMZ ने आता त्यांच्या मुलीचे नाव ठेवले आहे. (Bollywood News)

काय आहे प्रियांकाच्या मुलीचे नाव

टीएमझेडच्या म्हणण्यानुसार, प्रियांका आणि निकच्या मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्या प्रमाणपत्रात नाव नमूद केले आहे. 'मालती मेरी चोप्रा जोनास' असे नाव या जन्माच्या दाखल्यावर दिसून आले. मालतीचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो येथे 15 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यानंतर झाला होता, असे असले तरी अद्याप प्रियांकाने आपल्या मुलीच्या नावाची माहिती दिली नाही. या मुलीच्या नावाचा एक विशेष अर्थ असू शकतो. कारण प्रियांकाच्या मुलीच्या नावात भारतीय आणि पाश्चिमात्य झलक दिसून आली आहे.

21 जानेवारीला दिली आनंदाची बातमी

प्रियांका आणि निक यांनी 21 जानेवारी रोजी आपल्या मुलीचे स्वागत केल्याची आनंदाची बातमी दिली होती. नवजात पालकांनी ही बातमी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांशी शेअर केली होती. 'आम्ही सरोगसीद्वारे आमच्या बाळाला जन्म दिली आहे. आमच्या बाळाचे आम्ही आनंदात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.' असे कॅप्शन या पोस्टला आणि फोटोला देण्यात आली होती.

प्रियांका आणि निक यांनी 21 जानेवारीला मुलीच्या जन्माची घोषणा केली होती, परंतु रिपोर्ट्सनुसार, या तारखेच्या 12 आठवड्यांपूर्वी मुलीचा जन्म झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचा जन्म 27 व्या आठवड्यात झाला. एप्रिलमध्ये बाळाचा जन्म होणार होता मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरीमुळे बाळाला काही काळ रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT