Tobacco Controversy: ट्रोल झालेल्या अक्षयने मागितली माफी, म्हणाला- मी निर्णय मागे घेतो...

विमल इलायची जाहिरातीसंबधी तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे तुमच्या भावना व्यक्त केल्या, त्या तुमच्या भावनांचा मी आदर करतो.
Akshay Kumar Tobacco add
Akshay Kumar Tobacco addTwitter
Published on
Updated on

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे . अक्षय कुमार एका तंबाखूच्या जाहिरातीमुळे (Tobacco Advertisement) सोशल मीडियावर चर्चेत होता . बॉलिवूड अभिनेत्त्याने तंबाखूची जाहिरात केली होती, ज्याबद्दल त्याचे चाहते अभिनेत्यावर खूप नाराज होते. या जाहिरातीबद्दल बरेच ट्रोल (Akshay Kumar Troll on social media) झाले. आता अक्षयने या समर्थनाबाबत एक विधान जारी केले असून त्यात त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे. (Akshay Kumar Tobacco Controversy)

Akshay Kumar Tobacco add
... म्हणून नेटफ्लिक्सचे सब्सक्रायबर्स घटले; कंपनीला मोठा झटका

अक्षय कुमारने आपल्या दिलगीर पत्रात लिहिले आहे की, “मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिसादाने मला धक्का बसला आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही. विमल इलायची जाहिरातीसंबधी तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे तुमच्या भावना व्यक्त केल्या, त्या तुमच्या भावनांचा मी आदर करतो.

मी विचार करूनच कोणताही पर्याय निवडेन

“मी पूर्ण नम्रतेने यातून माघार घेत आहे. या जाहिरातीतून मिळालेले सर्व पैसे मी काही चांगल्या कारणासाठी वापरायचे ठरवले आहे. कायदेशीर कारणांमुळे ही जाहिरात विहित वेळेसाठी प्रसारित करण्याचा करार आहे. एवढेच नाही तर भविष्यात अशा जाहिरातींपासून सावध राहण्याचे आश्वासनही अक्षयने त्याच्या चाहत्यांना दिले आहे. नीट विचार करूनच मी कोणताही पर्याय निवडतो, त्या बदल्यात, मला तुम्हा सर्वांकडून प्रेम आणि शुभेच्छा मिळतील." अशी पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.

Akshay Kumar Tobacco add
Gangubai Kathiawadi OTT: आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' लवकरच होणार नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

या जाहिरातीत शाहरुख आणि अक्षयही दिसले होते

या जाहिरातीत अक्षयसोबत अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता अजय देवगण देखील दिसले होते . ही जाहिरात प्रसारित होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर या अभिनेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com