RRR S.S.Rajamauli Dainik Gomantak
मनोरंजन

Golden Globe RRR : PM मोदी यांच्याकडुन RRR च्या टीमचं कौतुक,ट्वीटरवर काय म्हणाले मोदीजी?

RRR चित्रपटाच्या नाटु नाटु गाण्याचा सन्मान होताच PM मोदींनी केलं कौतुक...

Rahul sadolikar

2022 सालीअगदी मोजक्याच हिट ोज झालेला RRR हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यातील 'नाटु नाटु' हे गाणंही लोकांना आवडलं होतं. या गाण्याला ऑस्कर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. 

आता या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे, ज्याची माहिती गोल्डन ग्लोबच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे. 

हा पुरस्कार जिंकल्यानंतर आरआरआर या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. ही बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'नाटु नाटु' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळ्या कलाकारांचे अभिनंदन केले. 

या वर्षी गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सची 80 वा साोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन येथे सुरू झाला आहे. 

यामध्ये RRR या भारतीय चित्रपटातील 'नाटु नाटु' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी लिहिले- एका अतिशय विशेष कामगिरीसाठी प्रेरणा - @mmkeeravaani , प्रेम रक्षित, काल भैरव, चंद्रबोस @Rahulsipligunj, मी अभिनंदन करतो -@ssrajamouli , @tarak9999, @AlwaysRamCharan, आणि संपूर्ण टीम @RRRMovie, या प्रतिष्ठित सन्मानामुळे प्रत्येकाचा गौरव झाला आहे. भारतीयांचा अभिमान.

स्वत: पंतप्रधान मोदींनी अशा जबरदस्त शुभेच्छा दिल्यामुळे RRRची टीम भारावुन गेली असेल हे नक्की. पंतप्रधान मोदी हे नेहमीच देशातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीने एखादी गौरवास्पद कामगिरी केली कि त्याचं कौतुक करतातच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT