मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात चित्रकार दिलेश हजारे यांचे चित्र
मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात चित्रकार दिलेश हजारे यांचे चित्र Dainik Gomantak
मनोरंजन

मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात चित्रकार दिलेश हजारे यांचे चित्र

दैनिक गोमन्तक

दिलेश हजारे चित्रकलेच्या साऱ्याच माध्यमात काम करतो. गोव्यातले चित्रकार, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने आपल्या चित्रांचे प्रदर्शन करत असतात, त्यात दिलेशचे नाव अंतर्भूत आहे. सांघिक प्रदर्शनामध्ये त्याची चित्रे मांडलेली असतातच पण त्याच्या चित्रांची एकल प्रदर्शनेही गोव्यात आणि दिल्लीच्या ललित कला अकादमीत आयोजित झालेली आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या चित्रांना अनेकदा पुरस्कार लाभले आहेत.

उत्तरप्रदेशमधल्या झांसी शहरातल्या ‘मणिकर्णिका’ या संस्थेने आयोजित केलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चित्रकला प्रदर्शनासाठी दिलेशच्या चित्राची निवड झालेली आहे. ‘मणिकर्णिका’ने हे प्रदर्शन जगातल्या जेष्ठ चित्रकारांसाठी आयोजित केले आहे. या प्रदर्शनासाठी वेगवेगळ्या देशातून ‘मणिकर्णिका‘कडे हजारो प्रवेशिका आल्या आहेत. त्यापैकी साधारण 150 चित्रे या प्रदर्शनात मांडली जातील.

‘मणिकर्णिका’ ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून कला क्षेत्रात काम करत असली तरी, गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या कार्याला अधिक गती दिली. या संस्थेच्या संचालिका कामिनी बाघेला सांगतात, या काळात अनेक कला-गॅलरी बंद झाल्या, परंतु चित्रकारांची कामे सुरू होती. त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे होते. एकापरीने ‘मणिकर्णिका ‘ने एक सशक्त व्यासपीठ, त्यांच्या सतत चालणाऱ्या उपक्रमाद्वारे, चित्रकारांना उपलब्ध करून दिले. त्यांच्या ऑनलाइन प्रदर्शनामुळे अनेक चित्रकारांची चित्रेही विकली गेली. कामिनी वाघेला या स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या एक चित्रकार आहेत.

दिलेश हजारे हा जरी चित्रकार असला तरी इंटेरिअर डिझायनिंग, नाटक या क्षेत्रातही त्याचे काम चालू असते. कोरोना काळातदेखील त्याची चित्रनिर्मिती आणि चित्र प्रदर्शनात भाग घेणे चालूच होते. 2021 मधल्या तेहरान, इराण मधल्या ऑनलाईन कॉफी पेंटिंग स्पर्धेत निवड झालेल्या मोजक्या चाळीस चित्रकारांत दिलेश निवडला गेला होता. लंडनमधील ‘युएसईयुएम’ मार्फत वर्ल्ड आर्टसाठी दिलेशच्या चित्राची निवड झाली होती. इंडो-जॅपनीज असोसिएशनच्या उपक्रमातही त्याचे चित्र निवडले गेले होते. 2020 साली पोलंडमध्ये झालेल्या पहिल्या द्वैवार्षिक प्रदर्शनात त्याच्या जलरंगातील चित्राची निवड झाली होती. दक्षिण कोरियामध्ये भरलेल्या प्रदर्शनात त्याचे चित्र भारतीय पॅव्हेलियनमध्ये मांडण्यात आले होते. भारतात आयोजित झालेल्या अनेक आर्ट कॅम्पमध्ये तो सामील झालेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

CM Pramod Sawant: ''किनारी भागातील व्यवसायांच्या संरक्षणासाठी...''; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आश्वस्त

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

Chandel Water Treatment Plant: चांदेल जलशुद्धी प्रकल्पामध्ये ‘क्लोरीन’ गळती; अनर्थ टळला

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT