Pakistani court issue warrant against  Bollywood actress Saba Qamar
Pakistani court issue warrant against Bollywood actress Saba Qamar  Dainik Gomantak
मनोरंजन

'हिंदी मीडियम' फेम अभिनेत्री सबा कमरवर पाकिस्तानात अटकेची कारवाई

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर (Saba Qamar) अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. लाहोरमधील (Lahore) ऐतिहासिक मशिदीत (Masjid) नृत्याचा व्हिडिओ (Dance Video) शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री सबा कमरविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्याप्रकरणी पाकिस्तानातील (Pakistan)स्थानिक न्यायालयाने बुधवारी तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. लाहोर मॅजिस्ट्रेट कोर्टाने (Lahore Court) बिलाल सईद आणि इरफान खान यांच्यासोबत 'हिंदी मीडियम' चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री सबा हिच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यासह न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 6 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे.(Pakistani court issue warrant against Bollywood actress Saba Qamar)

गेल्या वर्षी लाहोर पोलिसांनी कमर आणि सईदविरोधात कायद्याच्या कलमांखाली मस्जिद वजीर खानचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी मशिदीसमोर नाचतानाचा एक व्हिडिओ शूट केला होता, त्यानंतर वाद सुरू झाला. या घटनेवर पाकिस्तानच्या जनतेनेही नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर पंजाब प्रांताच्या सरकारने या संदर्भात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले होते. त्याचवेळी कमर आणि सईदनेही वादानंतर सोशल मीडियावर माफी मागितली होती.

गेल्या वर्षी लाहोर पोलिसांनी सबा कमर आणि सईद यांच्याविरोधात पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर मस्जिद वजीर खानचे पावित्र्य बिघडवल्याचा आरोप आहे. एफआयआरनुसार, दोन्ही कलाकारांनी मशिदीत नृत्याचा व्हिडिओ शूट करून मशिदीच्या पावित्र्याचे उल्लंघन केले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमधील लोकांनी याबद्दल खूप विरोध केला. पंजाब सरकारने या प्रकरणात दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबितही केले होते.

ज्याप्रकारे लोकांनी या नृत्याच्या व्हिडिओवर टीका केली आणि सबा कमर यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या. सबा म्हणाले की, म्युझिक व्हिडिओमध्ये एक निकाह सीन शूट करण्यात आला आहे. यामध्ये कोणतेही गाणे, संगीत किंवा संगीत ट्रॅक संपादनामध्ये जोडले गेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: विजय सरदेसाई यांनी काँग्रेस का सोडली? मनोज परब यांचा सवाल

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

Colva Road Tree Cutting : कोलवा मार्गावरील प्रकार; फांद्या छाटण्‍याच्‍या नावाखाली झाडांची कत्तल

SCROLL FOR NEXT