Salman Khan ने घेतली न्यायालयात धाव

सलमान खानने मुंबईत 'सेल्मन भोई' नावाच्या कॉम्प्युटर गेमविरोधात कायदेशीर खटला दाखल केला आहे
Salman Khan
Salman KhanDainik Gomantak

सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याने न्यायालयात (court) धाव घेतली असून त्याने 'सेल्मन भोई' (Selmon Bh0i) या गेम विरोधात तक्रार दाखल केली आहे. 'सेल्मन भोई' हा गेम 'सलमान भाई' या टोपण नवाला मिळता असल्याचे सलमान खान याचे म्हणणे आहे. सलमान खानने मुंबईत 'सेल्मन भोई' नावाच्या कॉम्प्युटर गेमविरोधात कायदेशीर खटला दाखल केला आहे, जो 2002 मध्ये अभिनेत्याच्या हिट अँड रनच्या (2002 hit-and-run case) घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते.

Salman Khan
'Taapsee Pannu' शूटिंग निमित्ताने गोव्यामध्ये दाखल

सोमवारी मुंबईच्या दिवाणी न्यायालयाने सुपरस्टार सलमान खानला अंतरिम मंजुरी दिली असून गेमच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे . सलमानला २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने २००२ च्या हिट अँड रन प्रकरणामधून निर्दोष मुक्त केले होते. गेल्या महिन्यात, सलमान खानने गेमच्या डेव्हलपर्सविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आणि आरोप केला की गेममध्ये दाखवलेले नाव आणि छायाचित्रे ही त्याची व्यंगचित्र असल्याचे दिसते.

Salman Khan
'या' मराठी चित्रपटासाठी आशाताईंनी वयाच्या 88 व्या वर्षीही गायले गाणे

एका अग्रगण्य दैनिकातील अहवालानुसार, न्यायालयाने गेमचे निर्माते, पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या संचालकांना गेम किंवा सलमानशी संबंधित इतर कोणत्याही सामग्रीचे प्रक्षेपण, पुन्हा प्रक्षेपण, प्रसार, किंवा डुप्लिकेट करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

कोर्टाने केवळ गेमच्या निर्मात्यांना गूगल प्ले स्टोअर आणि इतर सर्व प्लॅटफॉर्मवरून गेम त्वरित काढून टाकण्याचा आदेश दिला नाही, तर असेही म्हटले आहे की सलमानने या खेळासाठी कधीही अधिकृतता दिली नाही. "खेळ आणि त्याची प्रतिमा पाहिल्यावर, प्रथमदर्शनी तो फिर्यादी (खान) ची ओळख आणि फिर्यादीशी संबंधित हिट अँड रन प्रकरणाशीच जुळतो."कोर्टाच्या म्हणण्या नुसार समोर येत आहे.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, सेल्मन भाईने अभिनेत्याच्या प्रतिमेला हानी पोहचवली आणि न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अभिनेत्याच्या "गोपनीयतेच्या अधिकारापासून वंचित केले जात आहे आणि त्याची प्रतिमा देखील डागाळली जात आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com