Dunki updates Dainik Gomantak
मनोरंजन

Dunky Teaser : आसू आणि हसू घेऊन किंग खान सज्ज... डंकीची झलक पाहाच

Rahul sadolikar

Dunky teaser release on shahrukh khan's birthday : किंग खान अर्थात शाहरुख खानचा आगामी चित्रपट डंकी चाहत्यांसाठी मोठ्या उत्सुकतेचं कारण बनला आहे. याचं कारण म्हणजे डंकीसाठी पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि शाहरुख एकत्र काम करत आहेत.

शाहरुख खान या चित्रपटात एका वेगळ्या भूमीकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.

डंकीचा टिझर

बॉलिवूडचा किंग खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सकाळपासून सर्वत्र शाहरुखच्या नावाचीच चर्चा सुरू आहे. आज किंग खानचा 58 वा वाढदिवस आहे. त्याच्या 'डंकी' चित्रपटाशी संबंधित टिझर या खास दिवशी येणार होता आणि आता प्रतीक्षा संपली आहे. 

राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाची झलक अखेर दाखवण्यात आली आहे. 'पठाण' आणि 'जवान'नंतर शाहरुख पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे.

राजकुमार हिराणींची कथा

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा 'डिंकी' हा एक कॉमेडी ड्रामा आहे. 'डंकी फ्लाइट' नावाच्या बेकायदेशीर इमिग्रेशनवर ही कथा आधारित आहे. याचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले असून त्यांनी अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांच्यासोबत पटकथा लिहिली आहे.

डंकीमध्ये कोण दिसणार?

रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार झालेल्या डंकीमध्ये शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, दिया मिर्झा आणि बोमन इराणी हे कलाकार आहेत. त्यांच्याशिवाय धर्मेंद्र, सतीश शहा, परीक्षित साहनी हेही आहेत. असे म्हटले जात आहे की विकी कौशल आणि काजोल देखील कॅमिओ आणि स्पेशल अपिअरन्स असणार आहेत.

इथे झाले डंकीचे शूटींग

डंकीचे शूटिंग मुंबई, काश्मीर, लंडन बुडापेस्ट, जेद्दाह आणि निओम येथे झाले. ध्वनिफिती प्रीतम यांनी संगीतबद्ध केली आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी परदेशात आणि 22 डिसेंबर 2023 रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT