History TV18 Dainik Gomantak
मनोरंजन

History TV18 : 'OMG ये मेरा इंडिया'चा 9 वा सीजन प्रजासत्ताक दिनाला प्रेक्षकांच्या भेटीला?

History TV18 चा प्रसिद्ध शो 'OMG ये मेरा इंडिया' 26 जानेवारीला प्रिमीयर रिलीज होत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

History TV18 आणखी एक ओरीजीनल प्रॉडक्शन OMG भारतातील सर्वात यशस्वी मनोरंजन मालिका आणण्यासाठी सज्ज आहे! ये मेरा इंडियाचा नवीन सीजन गुरुवार, २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता प्रीमियर होणार आहे.

 भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रीमियर होत आहे, या सुपरहिट मालिकेचा सीझन 9 नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांना मनोरंजन, आश्चर्य वाटायला लावणारा आणि अभिमान वाटावा याची हमी देईल असं वाटतंय.

सर्वांचा आवडता टेलिव्हिजन स्टार कृष्णा अभिषेक होस्ट करत असलेला हिस्ट्री TV18 Original चा हा नवीन सीझन दहा भागांमध्ये देशाच्या विविध कानाकोपऱ्यातल्या 40 कथा दाखवणार आहे.

 भारताच्या इतिहासावर जगभरातील कल्पना, संस्कृती आणि प्रभाव आहे.त्यातूनच तो समृद्ध झाला आहे. ओएमजी! ये मेरा इंडिया आपल्या या एपिसोड्मधून देशातील महान विविधता दाखव तो आणि असामान्य प्रतिभा आणि असामान्य लोकांच्या स्वप्नांची आणि उत्कटतेची कथा सुंदरपणे सादर करता, त्याच्या आजवरच्या मिळालेल्या यशातून हेच दिसतं.

रेकॉर्ड ब्रेकर्स आणि काही प्रतिभासंपन्न लोकांना एकत्र आणून, हिस्ट्री TV18 ची ही मालिका प्रेक्षकांना प्रेरणा आणि मनोरंजन करण्याचे वचन देते. 

याचं उदाहरण म्हणजे जयपूर येथील एक कारागीर ज्याने सोन्या-चांदीवर क्लिष्ट डिझाईन्स कोरण्याच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवले आहे आणि आपल्या हस्तकलेतून 53 जागतिक विक्रम केले आहेत!

 दुसरीकडे, कीबोर्ड बटणे, कागदी कप, मातीचे दिवे, पुस्तके आणि रॅपर्स यांसारख्या टाकून दिलेल्या साहित्यातून विशाल मोझॅक कलाकृती तयार करून 15 विक्रम करणारे मुंबईतील भन्नाट कलाकारही यात आपल्याला दिसतील. 

या कलाकारांना केलेल्या काही प्रसिद्ध कामांमध्ये ७५,००० सीडींमधून बनवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट आणि ४३,००० कॅसेट वापरून बनवलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्ट्रेट यांचा समावेश आहे. 

एखाद्याचा कचरा हा दुसऱ्याचा खजिना ठरू शकतो. वाक्य मुंबईच्या एका उद्योजकाने सिद्ध केलं आहे. मऊ खेळणी, उशी आणि अगदी डासांपासून बचाव करण्यासाठी सिगारेटच्या थोटकांचा वापर केला आहे. 

भारतात दरवर्षी 10,000 कोटींहून अधिक सिगारेटचे तुकडे कचऱ्यात जातात, त्यामुळे पर्यावरणाला धोका वाढतो. 

आधुनिक काळातील चिंता लक्षात घेऊन अशा कथांची निवड करण्यात आली आहे. 'शाश्वत' विचार हा या सीझनच्या मुख्य थीमपैकी एक आहे साहजिकच प्रेक्षक OMG ची वाट पाहत आहेत!

ये मेरा इंडियामध्ये अनेक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रम पाहायला मिळतील जे तरुणांना नक्कीच आकर्षित करतील. पश्चिम बंगालमधील पर्यावरण अभियांत्रिकी पदवीधराने जलकुंभाचा प्रसार रोखण्यासाठी एक मनोरंजक उपाय शोधून काढला आहे.

 तिचा हा अनोखा उपक्रम वॉटर हायसिंथच्या फायबरचा वापर करून साडी बनवतो, तसेच 200 हून अधिक महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतो. 

कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी फटाक्यांच्या जागी ड्रोन लाइट शो आणि शून्य कचऱ्याच्या बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी 3D प्रिंटेड घरे देण्यापासून, भारतातील प्रतिभावान लोक खरोखर बदल घडवून आणण्याचे आव्हान पेलत आहेत. ओएमजी! याही सीजनला चांगला प्रतिसाद मिळेल हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

SCROLL FOR NEXT