Indian Panorama
Indian Panorama Dainik Gomantak
मनोरंजन

नुसरत जहां यांचा ‘डिक्शनरी’ चित्रपट ‘इंडियन पॅनोरामा’तून वगळला!

दैनिक गोमन्तक

52व्या इफ्फीत ‘इंडियन पॅनोरमा’ (Indian Panorama) विभागात निवड झालेल्या चित्रपटांच्या यादीत सुरुवातीला पंचवीस नावे होती. ही यादी दैनिक गोमन्तकमध्ये प्रसिद्धही झाली होती. मात्र जेव्हा ही इफ्फीच्या संकेतस्थळावर जाऊन, ती यादी आता कोण बघायला जातील तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल कारण यादीत आता 24 चित्रपटच बाकी राहिलेत. त्यातला एक चित्रपट ‘डिक्शनरी’, (Dictionary) जो बंगाली होता, तो गाळला गेला आहे. अर्थात यामुळे जो गदारोळ उठायचा होता तो उठलाच आहे.

या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शक (Bengali film Director) वृत्य बसू आहेत जे तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) या पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि त्याच बरोबर पश्चिम बंगालचे ते सध्याचे शिक्षण मंत्रीही आहेत. त्यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन दिल्लीमधल्या केंद्रीय नेतृत्वावर तोफही डागली. केवळ राजकीय हेतूनेच आपला चित्रपट ’इंडियन पॅनोरामा’तून काढून टाकला आहे, हा त्यांनी केलेला आरोप आहे.

इफ्फी (International Film Festival of India) च्या आयोजकांनी त्यांना जे पत्र पाठवले त्यात असे नमूद करण्यात आले आहे की चित्रपटातल्या नावाच्या स्पेलिंगच्या चुकीमुळे हा चित्रपट यादीतून गाळण्यात आला. अर्थात आयोजकांनी त्यांना डिक्शनरी च्या जागी दुसरा चित्रपटही पाठवायला सांगितले सांगितले आहे पण जर दुसरा चित्रपट पाठवला तर तो कुठल्या निकषावर आणि कोण निवडतील हा प्रश्न मात्र कसा सोडवला जाईल याचे स्पष्टीकरण झालेले नाही.

नावात अशी चूक झाल्यामुळे किंवा नाव न आवडल्यामुळे ‘इंडियन पॅनोरामा’ची अंतिम यादी याप्रकारे अलीकडे बदलत जात असलेली दिसते. काही वर्षांपूर्वी ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाबद्दल असेच घडले होते. नावात शुचिता जपण्याची खबरदारी बाळगणारी ही मंडळी निवड समितीपेक्षाही अधिक सामर्थ्यवान असतात.

‘डिक्शनरी’ या चित्रपटाची नायिका नुसरत जहां (Nusrat Jahan), ह्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार (MP) आहेत. जेव्हा चित्रपट ‘इंडियन पॅनोरामा’त निवडला गेला तेव्हा ही बातमी प्रसिद्ध झाली होती. बंगालमधील प्रसिद्धी माध्यमातून जल्लोष झाला होता. नुसरत जहां या बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

दिग्दर्शक बसू यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘डिक्शनरी’ची निवड झाल्यानंतर आयोजकांना कदाचित त्यांची राजकीय ओळख कळून आली असावी आणि त्यामुळेच त्याला यादीतून गाळले गेले असावे. काही असले तरी ‘डिक्शनरी’ला ‘इंडियन पॅनोरामा’तून वगळण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. ‘इंडियन पॅनोरमा’ विभागासाठी ज्युरी सदस्य असलेल्या जयश्री भट्टाचार्य या देखील या मागचे कारण सांगायला असमर्थ आहेत. आणि अर्थातच ह्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालनालय याबद्दल काही बोलण्यास तयार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT