IFFI 2021: 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पोस्टर रिलीज

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2021) यंदा 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येईल
Released poster for 52nd IFFI 2021
Released poster for 52nd IFFI 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा राज्यात (Goa) कोविडची रुग्णसंख्या व मृत्यू घटत असतानाच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) यंदा 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा दिल्लीत करण्यात आली. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी 52 व्या इफ्फीचे नियम व भित्तीपत्रक जारी केले. (Released poster for 52nd International Film Festival of India 2021)

इफ्फी हा आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. गेल्या जानेवारीतील 51 व्या इफ्फीचे यश लक्षात घेता 52 वा इफ्फी संमिश्र स्वरूपात आयोजित केला जाईल. राज्य सरकारची गोवा मनोरंजन संस्था आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय (DFF) या महोत्सवाचे आयोजन करते. इफ्फीच्या स्पर्धात्मक विभागात सहभागी होण्यासाठी 31ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल.

भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यावेळी इफ्फीमध्ये भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय विशेष कार्य आढाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करेल. तसेच त्यांच्या कारकिर्दीचा वारसा जपत, “चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार” या वर्षापासून प्रत्येक वर्षी इफ्फीमध्ये देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com