Nora Fatehi| FIFA 2022
Nora Fatehi| FIFA 2022 Dainik Gomantak
मनोरंजन

Nora Fatehi Viral Video: फिफा फॅनफेस्टमध्ये नोराकडून 'तिरंगा' चा अपमान, पाहा व्हिडीओ

दैनिक गोमन्तक

कतारमध्ये (Qatar) सध्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धा सुरू आहे, त्याच निमित्ताने नुकताच फिफा फॅन फेस्ट झाला. या फॅन फेस्टमध्ये मंगळवारी बॉलिवूडची लोकप्रिय डान्सर नोरा फतेहीने उत्साहात भारतीय तिरंगा फडकवत 'जय हिंद'चा नारा दिला. पण हा तिरंगा तिने उलटा पकडल्याने सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. तसेच नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

बॉलिवूडची लोकप्रिय डान्सर नोरा सध्या कतारमध्ये आहे. 'फिफा विश्वचषक 2022' दरम्यान डान्स करतांनाचे नोराचे अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल झाले आहेत. दरम्यान, नोराच्या एका चुकीने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यात येत आहे. डान्स करतांना नोराने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत 'जय हिंद'च्या घोषणा दिल्या पण तिच्याकडून एक चूक झाली.

या एका चुकीमुळे नोरावर प्रचंड टीका होत आहे. 'लाइट द स्काई अँथम'वर थिरकल्यानंतर नोराने तिरंगा फडकवला. या व्हिडीओमध्ये नोराने उत्साहाच्या भरात तिरंगा उलटा पकडलेला दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) तिला चांगलचे ट्रोल केले जात आहे. 

नोराने तिरंगा चुकीच्या पद्धतीने उचललेला व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर तिने तिरंगा एका व्यक्तीच्या दिशेने फेकला आहे. नोराने राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. एकीकडे 'जय हिंद'च्या घोषणा देणारी नोरा दुसरीकडे मात्र राष्ट्रध्वजाचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना पाहून तिचे चाहते नाराज झाले आहेत. 

नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि डान्सर आहे. 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री केली आहे. 'दिलबर' या गाण्याने तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर ती एका पेक्षा एक चित्रपटामध्ये डान्स करताना दिसून आली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT