Nora Fatehi: फिफा फॅनफेस्टमध्ये 'तिरंगा' झळकावत नोरा फतेहीने जिंकली मनं, watch video

फिफा फॅनफेस्टमध्ये नोरा फतेहीने भारताचा तिरंगा फडकावत चाहत्यांना खूश केले आहे.
Nora Fatehi
Nora FatehiDainik Gomantak

Nora Fatehi: कतारमध्ये सध्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धा सुरू आहे, त्याच निमित्ताने नुकताच फिफा फॅन फेस्ट झाला. या फॅन फेस्टमध्ये मंगळवारी नोरा फतेहीने अनेक भारतीयांचे मन जिंकले आहे. तिने या कार्यक्रमात भारतीय तिरंगा फडकवत 'जय हिंद'चा नारा दिलेला.

नोरा एक उत्तम डान्सर असून तिने अनेकदा शानदार परफॉर्मन्स दिले आहेत. तिचे भारतातही मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

Nora Fatehi
FIFA World Cup 2022: 'रेनबो फ्लॅग' घेऊन प्रेक्षकाची लाईव्ह सामन्यादरम्यान थेट मैदानात धाव; Video

दरम्यान, जेव्हा मंगळवारी फिफा फॅन फेस्टमध्ये (FIFA Fan Fest) नोराने ओ साकी साकी, नाच मेरी राणी अशा काही गाण्यांवर परफॉर्मन्स केला होता. यादरम्यान तिला चाहत्यांचाही मोठा पाठिंबा मिळत होता. ती परफॉर्म करत असताना तिने भारतीय तिरंगा फडकावला. याबरोबरच नोराने (Nora Fatehi) जय हिंद असा नारा देत चाहत्यांबरोबर संवाद साधला.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

नोरा केवळ डान्सरच नाही, तर ती एक उत्तम गायक आणि मॉडेलही आहे. त्याचबरोबर ती अभिनेत्रीही असून तिने बाटला हाऊस, भूज: द प्राईड ऑफ इंडियासारख्या काही चित्रपटांमध्ये कामही केले आहे. ती भारतातील हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांमधील चित्रपटांत झळकली आहे. तसेच ती थँक गॉड या चित्रपटात अखेरची दिसली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com