Neutrality is also harmful to society Dainik Gomantak
मनोरंजन

तटस्थपणाही समाजाला घातकच

‘बबलू बेबीलॉन से’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत सारथी यांचे मत

दैनिक गोमन्तक

पणजी: कुछ लोग आये है पेड काटने मेरे गांव में अभी धूप है तो बैठे है उसके छांव में ‘बबलू बेबीलॉन से’ या चित्रपटाच्या माध्यमातून हाच संदेश आम्हाला द्यायचा असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत सारथी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इंडियन पॅनोरमाच्या (Indian Panorama) नॉन-फीचर फिल्म विभागात त्यांच्या या चित्रपटाचे आज प्रदर्शन झाले.

या चित्रपटाच्या निर्मितीमागच्या प्रेरणेविषयी बोलताना सारथी यांनी नमूद केले की, आपण जर कोणत्याही एका बाजूचे नसलो आणि तटस्थपणे जे काही होतेय ते पहात उभे असलो तरीही त्याचे परिणाम होत असतात, ही गोष्ट मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुढे म्हणाले की, लोक संदेश घ्यायला तयार असतात, परंतु त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करावे लागते. प्रेक्षकांनी थोडा वेळ थांबून, आपण नेमके कुठे जात आहोत, याचा जरूर विचार करावा.

चित्रीकरणानंतर या चित्रपटाला अंतिम स्वरूप कसे प्राप्त झाले, याविषयी बोलताना सारथी यांनी सांगितले की, आपण एकूण 22 पानांची पटकथा लिहिली होती. परंतु चित्रीकरणानंतर लक्षात आले की, हा चित्रपट ‘स्लो-बर्न’ व्यंग्यात्मकरितीने आपल्याला चांगला, प्रभावीपणाने दाखवता येऊ शकतो. चित्रपटामध्ये अशी अनेक दृश्ये आहेत, त्यांचा कथेच्या प्रवाहीपणावर कोणताही परिणाम न होता काढता आली असती. मात्र हे विराम, श्वासोच्छवासाच्या जागा मला चित्रपटामध्ये ठेवायच्या होत्या. त्यामुळे चित्रपटाचा स्वतःचा मूड तयार होऊन ती कथा प्रेक्षकांना पुढे घेऊन जाईल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये काही काळ रेंगाळला पाहिजे आणि त्याचा आनंददायी अनुभव त्यांना घेता आला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.

मनोज यांच्‍याकडून घेतला अनुभव

नायकाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, चित्रपट म्हणजे एक सहयोगी प्रयत्न होता. मनोज पाहवा यांनी माझ्याकडून या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत. इतकी वर्षे ते सिनेमा व्यवसायामध्ये काम करीत असूनही त्यांना कामाच्या तालमी करण्याची आवड आहे. चित्रीकरणाच्याआधी ते अतिशय विस्तृत टिपणे तयार करून यायचे. आमच्यासाठी ही गोष्ट म्हणजे नवीन शिकण्याचा अनुभव होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Retirement: क्रिकेट विश्वात एकच खळबळ! 'या' मॅचविनर ऑलराउंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Goa Politics: 'सभापती सरकारच्या हातचे बाहुले' सरदेसाईंच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत, फळदेसाईंचा सल्ला

Beti Ferry Boat: 'बेती' का बुडाली? तपास पुन्हा 'बंदर कप्तान'कडे, प्राथमिक चौकशीत मानवी चुकीने दुर्घटनेचा निष्कर्ष

Comunidade Land: कोमुनिदादच्या जमिनीत हस्तक्षेप नकोच! आसगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध

SCROLL FOR NEXT