Nana Patekar Funeral In Pune Dainik Gomantak
मनोरंजन

Nana Patekar Funeral In Pune: नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात होणार अंत्यसंस्कार; डोणजे गावातील शेतातच शेवटचे विधी करण्याची होती अभिनेत्याची इच्छा

Nana Patekar Funeral In Pune: भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. आता नाना यांच्या अंतिम संस्काराबद्दल मोठी माहिती समोर येतेय.

Manish Jadhav

Nana Patekar Funeral In Pune: भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. आता नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराबद्दल मोठी माहिती समोर येतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी आणि मुलगा दुपारपर्यंत गोव्यात पोहोचणार आहेत. त्यानंतर सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करुन त्यांचे पार्थिव विशेष विमानाने पुण्यात (Pune) आणण्यात येणार आहे. नाना यांच्यावर पुण्यात अत्यंसंस्कार होणार आहेत. भोर तालुक्यातील डोनजेगाव येथे हे अंत्यसंस्कार होणार आहेत.

नाना यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचे शेवटचे कार्य हे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे. त्यानुसार डोणजे गावतच अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांनी आपल्या अफाट अभिनय कौशल्याने आणि सामाजिक बांधिलकीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली.

नाना पाटेकर यांची कारकिर्द

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांचा अभिनय, संवादफेक आणि व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतण्याची शैली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘तिरंगा’, ‘अपहरण’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘क्रांतिवीर’मधील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nana Patekar Virat Kohli Fan: “विराट आऊट झाल्यावर जेवणाचा मूड जायचा”, नाना पाटेकर होते कोहलीचे डाय हार्ड फॅन; क्रीडा जगतानेही गमावला एक सच्चा चाहता

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून 3 टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर; पगारात किती वाढ होणार?

Luthra Brothers Bail: लुथरा बंधूंना सशर्त जामीन मंजूर, प्रत्येकी लाखाचा जातमुचलका; देश सोडण्यास मनाई

Nana Patekar Death: हातात बॅट-बॉल अन् दादरचं शिवाजी पार्क... सुनील गावस्करांसोबत खेळणारे 'नाना' क्रिकेटपासून दूर का गेले? वाचा खास किस्सा

Nana Patekar Famous Dialogues: 'एक मच्छर...' पासून 'कंट्रोल उदय कंट्रोल'पर्यंत! नाना पाटेकरांचा दमदार आवाज अन् जबरदस्त डॉयलॉग VIDEO

SCROLL FOR NEXT