Aryan Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

आर्यन खानचा पासपोर्ट परत करा, मुंबई न्यायालयाचा NCBला आदेश

जामीन अटींचा एक भाग म्हणून आर्यन खानने कोर्टात पासपोर्ट सादर केला होता.

दैनिक गोमन्तक

मुंबई : गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. यामुळे त्याला 2 ऑक्टोबर 2021 रोजी ताब्यात घेण्यात आले आणि 28 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. आता मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्लिन चिट दिली आहे. आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याच्या याचिकेला मुंबई कोर्टाने परवानगी दिली आहे.

आर्यन खानने जामीन अटींचा भाग म्हणून कोर्टात पासपोर्ट सादर केला होता. आणि तो न्यायालयाने आतापर्यंत जप्त करून ठेवला होता. आर्यनला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आता न्यायालयाने आर्यनला दिलासा दिला आहे.

अनेक महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर एनसीबीने गेल्या महिन्यात शाहरुख खानच्या लाडक्या आर्यनला क्लीन चिट दिली. पुराव्याअभावी आर्यनला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. यानंतर आर्यनने विशेष न्यायालयाकडे पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती आणि बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. आता न्यायालयाचा निर्णय आला आहे. यानंतर आर्यन खानला पासपोर्ट मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

आज आर्यन खानच्या पासपोर्टबाबत सुनावणी झाली. यादरम्यान स्टारकिडच्या बाजूने निर्णय आला. विशेष न्यायालयाने आर्यनचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले आहेत. हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यावर आर्यन खानने जामीन अटींखाली त्याचा पासपोर्ट कोर्टात जमा केला.

30 जून रोजी आर्यन खानने विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये त्याने कोर्टाकडे पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती. यादरम्यान, एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, पासपोर्ट परत करण्यास आणि जामीन बॉण्ड रद्द करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही. या याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी शाहरुख खानच्या मुलाला पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT