MS Dhoni, Rishabh Pant, Abdu Rozik Instagram
मनोरंजन

Dhoni-Pant Photo: सरत्या वर्षाला निरोप ! धोनी-पंत अन् अब्दू रोझीकचं बॉलिवूड कलाकारांबरोबर धमाल सेलिब्रेशन

Pranali Kodre

MS Dhoni, Rishabh Pant, Abdu Rozik party in Dubai with Kriti Sanon, Varun Dhawan ahead of New Year 2024:

जगभर सरत्या वर्षात वर्षाला निरोप दिला जात असून नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. यादरम्यान अनेक जण विविध पद्धतीने तयारी करत आहेत. अनेक जण फिरायलाही गेले आहेत. याचदरम्यान अनेक सेलिब्रेटीही दुसऱ्या देशात जाऊन हे क्षण साजरे करत आहेत.

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील त्याच्या कुटुंबासह सध्या दुबईत आहे. यावेळी त्याने काही कार्यक्रमांना, पार्टीला हजेरीही लावली आहे. यादरम्यानचे त्यांचे अनेक फोटो त्याची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

धोनीच्या या दुबई ट्रीपचे सध्या काही फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत. यामध्ये तो वरुण धवन, क्रिती सेनन या अभिनेत्यांबरोबरच बिग-बॉस फेम अब्दू रोझीकसह पार्टी करताना दिसत आहे. या पार्टीचे फोटोही अब्दूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

MS Dhoni, Rishabh Pant, Abdu Rozik, Varun Dhawan

अब्दूने या धोनीबरोबरचा फोटोही शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की 'माही! निकालापेक्षा प्रक्रिया जास्त महत्त्वाची असते. जर तुम्ही प्रक्रिया करताना काळजी घेतली, तर तुम्हाला निकाल मिळतो.'

ऋषभ पंतचेही हजेरी

धोनीबरोबर या पार्टीमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही दिसत आहे. धोनी आणि पंत मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. पंतच्या आणि धोनीबरोबरचे फोटोही अब्दूने शेअर केले आहेत.

दरम्यान, पंत धोनीबरोबर दुबईत एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दुबईत पंतने धोनी कुटुंबाबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर ख्रिसमस साजरा केला आहे. त्याचेही फोटो व्हायरल झाले होते.

पंतला भारतीय क्रिकेट संघातील धोनीचा वारसदारही म्हटले जाते. धोनीच्या निवृत्तीनंतर पंतने भारतीय संघात अपघातापर्यंत यष्टीरक्षकाची भूमिका चांगली सांभाळली होती. दरम्यान 2022 च्या अखेरीस झालेल्या कार अपघातात गंभीर दुखापत झाल्याने पंतला गेल्या वर्षभरात क्रिकेट खेळता आलेले नाही.

सध्या तो स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देत असून लवकरच क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तो यंदा आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसू शकतो. तसेच आयपीएलमधूनच त्याचे पुनरागमनही होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT