Rishabh Pant batting video after car accident:
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या कार अपघातात झालेल्या दुखापतींमधून सावरत आहे. दरम्यान, या अपघातानंतर त्याने त्याच्या आरोग्यात बरीत सुधारणा केली असून आता त्याने फलंदाजीलाही सुरुवात केली आहे. त्याचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोरही आला आहे.
भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विजयनगरमध्ये जेएसडब्ल्यू फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या सराव सामन्यात पंत खेळला. दरम्यान, यापूर्वीच बीसीसीआयने सांगितले होते की पंतने नेट्समध्ये फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की सराव सामन्यात फलंदाजी करताना त्याने काही मोठे शॉट्सही खेळले.
यावेळी त्याने षटकार मारल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला यावेळी चाहत्यांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्याला पुन्हा फलंदाजी करताना पाहून चाहते प्रचंड खूश असल्याचेही दिसून आले.
तथापि, पंत वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण जरी त्याने फलंदाजी करण्यास सुरुवात केली असली, तरी तो अद्याप दुखापतींमधून पूर्ण सावरलेला नाही. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी पूर्ण फिटनेस मिळवावा लागणार आहे.
पंतचा डिसेंबर 2022 अखेरीस दिल्लीवरून रुडकीला येताना गंभीर कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर जखमाही झाल्या. तसेच त्याची कार पूर्ण जळाली होती. पण सुदैवाने तो या गंभीर कार अपघातातून बचावला.
याच अपघातानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्याचमुळे त्याला गेल्या 8 महिन्यांपासून क्रिकेटमधून दूर रहावे लागले आहे.
पंतने आत्तापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत 33 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 43.67 च्या सरासरीने आणि 5 शतकांसह 2271 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 30 वनडे सामन्यांमध्ये 34.60 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 865 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर त्याने 66 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 987 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने यष्टीरक्षण करताना 129 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 190 विकेट्स घेतल्या. यात 166 झेलांचा आणि 24 यष्टीचीतचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.