

Yuti Drishti Yog: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांची युती आणि त्यांचा दृष्टी योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा दोन बलाढ्य ग्रह एकत्र येतात किंवा एकमेकांवर दृष्टी टाकतात, तेव्हा त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव सर्व राशींवर पडत असतो. पंचांगानुसार, येत्या 25 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी ग्रहांचा राजा 'सूर्य' आणि कर्माचा दाता 'शनी' हे दोन्ही ग्रह आमनेसामने येत 'युति दृष्टी योग' निर्माण करत आहेत.
सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र असले तरी ज्योतिष शास्त्रात ते एकमेकांचे शत्रू मानले जातात. त्यामुळे या दोन ग्रहांचा एकत्रित प्रभाव काही राशींसाठी अत्यंत प्रतिकूल ठरणार आहे. विशेषतः मार्च महिन्यात मेष, तूळ आणि कुंभ या तीन राशींच्या जातकांना या योगामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
तूळ राशीच्या लोकांसाठी 25 मार्चपासून सुरु होणारा हा काळ कसोटीचा असेल. व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर स्वतःच्याच काही चुकीच्या निर्णयामुळे हाताशी आलेली मोठी कामे बिघडू शकतात. आर्थिक बाबतीतही हा काळ जोखमीचा असून मोठी धनहानी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल, तर हा निर्णय सध्या लांबणीवर टाकणेच हिताचे ठरेल, अन्यथा भविष्यात मोठे नुकसान सोसावे लागेल. कौटुंबिक आघाडीवरही काही आव्हाने उभी राहतील. विवाहित व्यक्तींना आपल्या जोडीदाराच्या भूतकाळातील एखादी गुप्त गोष्ट समजण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊन वैवाहिक जीवनात उलथापालथ होऊ शकते.
कुंभ राशीच्या जातकांसाठी देखील हा दृष्टी योग शुभ संकेत देणारा नाही. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा उच्चारलेले शब्द तुमचे जवळचे संबंध कायमचे खराब करु शकतात. नातेवाईकांसोबतचे संबंध बिघडण्याची दाट शक्यता असून वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
आर्थिक स्थितीचा विचार करता, मार्च महिन्याच्या अखेरीस उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढल्याने मोठी आर्थिक घसरण पाहायला मिळेल. याशिवाय, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. विशेषतः डोळ्यांशी संबंधित काही गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. मेष राशीच्या लोकांसाठीही हा काळ संघर्षाचा असेल, जिथे त्यांना कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात सतत अडथळ्यांचा सामना करावा लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.