Rajpal Yadav Dainik Gomantak
मनोरंजन

राजपाल यादववर लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, पोलिसांनी बजावली नोटीस

इंदूर पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला फसवणुकीच्या आरोपाखाली नोटीस पाठवली आहे.

दैनिक गोमन्तक

Bollywood Actor Rajpal Yadav Accused Of Cheating: इंदूर पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला फसवणुकीच्या आरोपाखाली नोटीस पाठवली आहे. तुकोगंज पोलिसांनी राजपालला 15 दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तुकोगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारे व्यापारी सुरेंद्र सिंह यांनी अलीकडेच पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता, ज्यामध्ये त्यांनी चित्रपट अभिनेता राजपाल यादववर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान तुकोगंज पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली, ज्याच्या आधारे पोलिसांनी अभिनेता राजपाल यादवला नोटीस बजावून या संपूर्ण प्रकरणाचा जबाब मागवला आहे. (MP News Businessman From Indore Accuses Actor Rajpal Yadav Of Cheating Of Lakhs Of Rupees Ann)

मुलाला देणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

राजपाल यादवने (Rajpal Yadav) इंदूरच्या (Indore) तुकोगंज पोलीस स्टेशन (Police Station) परिसरात राहणाऱ्या तक्रारदार सुरेंद्र सिंह यांना आश्वासन दिले होते की, जर त्यांनी मला लाखो रुपये दिले तर मी त्यांच्या मुलाला बॉलिवूडमधील एन्ट्रीसाठी मदत करेन.' त्यानंतर सुरेंद्र सिंह यांनी मुलाच्या भविष्यासाठी राजपाल यादवला लाखो रुपये दिले. सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, 'पैसे घेतल्यानंतर राजपाल यादव फोन उचलत नाहीत आणि पैसे परत करण्याबाबत बोलत नाहीत.' यामुळे नाराज झालेल्या सुरेंद्र सिंह यांनी तुकोगंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

पोलिसांनी नोटीस पाठवून उत्तर मागितले

त्याचवेळी तुकोगंज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लल्लन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अर्जाची चौकशी केल्यानंतर आता अभिनेता राजपाल यादव यांना पोलिसांनी (Police) नोटीस बजावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT