Manasa Varanasi
Manasa Varanasi Dainik Gomantak
मनोरंजन

Miss World 2021 चा किताब का जिंकू शकली नाही भारताची Manasa Varanasi, कुठे चूक झाली?

दैनिक गोमन्तक

Miss World 2021: पोलंडच्या कॅरोलिना बिएलॉस्काच्या रुपात 2021 ची मिस वर्ल्ड मिळाली होती. तिने 70 व्या मिस वर्ल्डचा मुकुट पटकावला होता. भारताकडून या स्पर्धेत मनसा वाराणसीनेही भाग घेतला होता. मात्र, ती जिंकू शकली नव्हती. मनसा मिस वर्ल्डच्या 70 व्या एडिशनमध्ये विजेती ठरली नव्हती. त्याचबरोबर, ती टॉप 6 फायनलिस्टच्या यादीतही नव्हती. मात्र, मनसा वाराणसी कुठे कमी पडली ते जाणून घेऊया...

दरम्यान, मिस वर्ल्ड 2021 चा प्रवास मनसा वाराणसीसह सर्व स्पर्धकांसाठी अडचणींनी भरलेला होता. कोरोनाच्या काळात अनेकांना व्हायरसची लागण झाली होती. परंतु मनसा वाराणसीचा हा प्रवास फार काळ टिकू शकला नाही. मनसा वाराणसीसाठी या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली होती. या स्पर्धेच्या विविध भागांमध्ये तिने सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, या स्पर्धेत 40 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मनसा वाराणसीने टॉप 13 मध्ये आपले स्थान मिळवले होते. मात्र, यापलीकडे तिला प्रगती करता आली नाही.

तसेच, मिस वर्ल्ड 2021 मध्ये भारताचा ध्वज फडकवण्यासाठी मनसा वाराणसीला गेली होती. मात्र तिला ही संधी न मिळाल्याने ती रिकाम्या हाताने घरी परतली होती. 16 मार्च रोजी मिस वर्ल्ड 2021 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली होती. पोलंडच्या कॅरोलिना बिएलॉस्काने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. दुसरीकडे, इंडो-अमेरिकन स्पर्धक श्री सैनीला द्वितीय क्रमांक मिळाला होता. श्रीने अमेरिकेच्या (America) वतीने या स्पर्धेत भाग घेतला होता.

दुसरीकडे, 2020 मध्ये मनसा वाराणसीने फेमिना मिस इंडिया जिंकली होती. तिने मॉडेलिंगसोबतच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. मनसा वाराणसी ही हैदराबादची (Hyderabad) रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे नाव रविशंकर आणि आईचे नाव शैलजा आहे. मनसा मलेशियाला शिफ्ट झाली होती. याचे कारण तिचे वडिल कामानिमित्त तिथे होते. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ती भारतात परतली आणि तिने इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले.

त्याचबरोबर, मनसाने हैदराबादच्या वासवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. यानंतर तिने हैदराबाद येथील फॅक्टसेट या कंपनीत फायनान्शियल इन्फॉर्मेशन एक्सचेंज (FIX) विश्लेषक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान तिची संगीत, नृत्य आणि योग या विषयात रुची वाढली होती. मनसाने तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मिस फ्रेशरचा किताब पटकावला होता. त्यानंतर मनसाने फेमिना मिस इंडिया 2020 मध्ये भाग घेतला आणि जिंकली. याशिवाय, तिने मिस रॅम्पवॉकचा पुरस्कारही जिंकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT