Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्ससाठी यंदा भारताकडून जाणारी दिविता राय नेमकी कोण आहे?

मिस युनिव्हर्ससाठी भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या दिविता रायबद्दल चला जाणुन घेऊ..
Miss Universe 2023
Miss Universe 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

मिस युनिव्हर्स स्पर्धेचं बिगुल वाजलं असुन जगाच्या नजरा या स्पर्धेने वेधुन घेतलेल्या आहेत. मिस युनिव्हर्स स्पर्धा १४ जानेवारीपासून न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मोरिअल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू होईल. 

यंदा कर्नाटकची दिविता राय भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 71 व्या वार्षिक मिस युनिव्हर्स स्पर्धेत जगभरातून 86 महिला सहभागी होत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू यंदाच्या विजेत्याला मुकुट घालणार आहे. 

हरनाज संधूने गेल्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून भारताचे नाव उंचावले होते. यंदा दिविता रॉयकडून खूप अपेक्षा आहेत. गुरुवारी दिविता राय 'सोने की चिडिया' ही वेशभूषा करून मिस युनिव्हर्सच्या राष्ट्रीय वेशभूषा फेरीत पोहोचली.

 11 मे 1999 रोजी मंगळुरु, कर्नाटक येथे जन्मलेल्या, आर्किटेक्चर, सुपर मॉडेल आणि मिस दिवा युनिव्हर्स दिविता रायचं शालेय शिक्षण नॅशनल पब्लिक स्कूल, बंगळुरू इथे झालं . दिविताचे वडील दिलीप राय यांच्या नोकरीच्या सततच्या बदलीमुळे दिविताचं बालपण भारतातल्या विविध शहरात गेले.

 एका मुलाखतीदरम्यान दिविता रायने सांगितले की, जेव्हा ती 3 वर्षांची होती तेव्हा तिची आई आणि आजी तिला फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि लिटिल मिस इंडियासाठी तयार करत होत्या साहजिकच अशा स्पर्धांसाठीची तयारी दिविता लहानपणापासुनच बघत होती.

Miss Universe 2023
Miss Universe 2023: यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कधी, कुठे अन् कशी पहायची; जाणून घ्या

मिस इंडिया किंवा मिस युनिव्हर्स बनण्याचं हे स्वप्न दिवितानं लहानपणीच पाहिलं होतं ;आणि एक दिवस नक्कीच मिस इंडिया किंवा मिस युनिव्हर्स बनणार असा निश्चय केला होता.

दिविता रायचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दिविता रायने यापूर्वीच LIVA मिस दिवा युनिव्हर्स 2022 चे विजेतेपद पटकावले आहे.

यावर्षीचा मिस युनिव्हर्स स्पर्धेचा कार्यक्रम माजी मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया कल्पो आणि प्रसिद्ध टीव्ही पर्सनॅलिटी माई जेनकिन्स होस्ट करणार आहेत.याआधी प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते स्टीव्ह हार्वे यांनी पाच वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

तुम्हाला तुमच्या आवडत्या स्पर्धकाला मत द्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या फोनवर मिस युनिव्हर्स अॅप डाउनलोड करावे लागेल. त्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊ शकता.याशिवाय, तुम्ही vote.missuniverse.com या वेबसाइटवरून तुम्हाला तुमच्या आवडत्या स्पर्धकाला मतदान करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com