Milind Soman Goa Trip Dainik Gomantak
मनोरंजन

59व्या वर्षीही तरुणांना लाजवतोय Milind Soman! पाऊस, वारा, डोंगर पार करत सायकलवर निघालाय गोव्याला Watch Video

Milind Soman Cycling Goa: मुंबई ते गोवा असा धावण्याचा आणि सायकल चालवण्याचा प्रवास त्याने सुरू केला असून या प्रवासातील काही व्हिडीओ आणि फोटोज त्याने सोशल मीडियावर शेअर केले

Akshata Chhatre

Milind Soman Viral Video: फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण सध्या 'FitIndianRun' मुळे चर्चेत आहे. मुंबई ते गोवा असा धावण्याचा आणि सायकल चालवण्याचा प्रवास त्याने सुरू केला असून या प्रवासातील काही व्हिडीओ आणि फोटोज त्याने सोशल मीडियावर पत्नी अंकितासोबत शेअर केले आहेत. मिलिंदने सांगितले की, तो दररोज ९० किमी सायकल चालवतो आणि २० किमी धावतो.

'घाटावर घाट, घाटावर घाट' - मिलिंदचा अनुभव

सोशल मीडियावर अपडेट देताना मिलिंदने लिहिले, "दुसरा आणि तिसरा दिवस फक्त डोंगर, डोंगर, डोंगर आणि घाटावर घाट, घाटावर घाट असा होता. सलग तीन दिवस ९० किमी सायकलिंग आणि २० किमी धावणे असा अनुभव होता, खूप छान वाटतंय." लोक मला नेहमी विचारतात, 'का करतोस इतकं?' पण मला वाटतं, जर मी प्रत्येक वयात मन आणि शरीराच्या क्षमतेच्या मर्यादा शोधल्या नाहीत, तर मी खऱ्या अर्थाने जगलोच नाही किंवा देवाने दिलेल्या अद्भुत देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही."

चौथ्या दिवशीचा अनुभव सांगताना मिलिंद म्हणाला, "मुंबई ते गोवा प्रवासाचा चौथा दिवस - डोंगर आणि पाऊस, डोंगर आणि पाऊस, डोंगर आणि पाऊस आणि वारा असा होता. ९० किमी सायकलिंग आणि २० किमी धावण्याच्या या दैनंदिन कामाशी शरीर जुळवून घेतल्यासारखे वाटतेय. अशा आव्हानांमधूनच मानवी मन, शरीर आणि आत्म्याची अद्भुत शक्ती आपल्याला समजते. या समजुतीतूनच जीवनाचा पूर्ण आनंद घेता येतो!"

केदारनाथचा खडतर प्रवास आणि 'फिटेस्ट जोडी'चा मान

यापूर्वी, मिलिंद आणि अंकिता यांनी केदारनाथपर्यंतची एक अध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक ट्रेकिंग यात्रा केली होती. त्याचे फोटो शेअर करताना 'द रॉयल्स' अभिनेता मिलिंदने लिहिले होते, "चौमासी ते केदारनाथपर्यंत, खाम बुग्याल मार्गे १४,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवरील हाथणी कोल पार करून ट्रेक केला, किती सुंदर प्रवास होता.

केदारनाथपर्यंत सुमारे ३० किमीचा प्रवास होता आणि तो पूर्ण करायला आम्हाला २ दिवस लागले. दुसऱ्या दिवशी १७ तास चढाई आणि बर्फ पार करावा लागला, पण पहाटे १ वाजता केदारनाथ मंदिर पाहण्याचा उत्साह सर्व थकवा दूर करणारा होता."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT