Milind Soman: 'मेन डिश वॉशर जेली' ची जाहिरात मिलिंदच्या अंगलट, नेमकं काय कारण

भारताचा सुपरमॉडेल मिलिंद सोमणची नवी जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Milind Soman
Milind Soman Dainik Gomantak

भारताचा सुपरमॉडेल मिलिंद सोमणची (Milind Soman) नवी जाहिरात वादाच्या भोवऱ्यात चागंलीच सापडली आहे. मिलिंद त्याच्या वादग्रस्त वक्तव्य आणि व्हिडिओमुळे सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदला चर्चेत राहणे आवडते. त्याची डिश वॉशर जेल या जाहिरातने सोशल मीडियावर (Social Media) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या जाहिरातीमध्ये जीम करत असलेला तो तरुण मुलीकडे पाहून म्हणतो मी आईला भांडी घासण्यास मदत केल्याचे सांगतो. त्यामुळे मी फार थकलो आहे याचे कारण मी काल घरातील सगळी भांडी घासली आहे. त्याची ती गोष्ट मिलिंदने ऐकल्यानंतर त्याला त्या नवीन भांडी घासण्याविषयीच्या जेलची माहिती देतो. तू तर मोठ्या बाता मारल्या आहेस, आता तू त्या आणखी मारु शकतोस, कारण तुझ्याकडे आहे व्हिम ब्लॅक लिक्विड. ज्यामुळे तुला काहीही अडचण येणार नाही.

त्या व्हिडिओच्या (Video) शेवटी मिलिंद पोझ देत म्हणतो, हे घे व्हिम ब्लॅक भांड्यांची साफसफाई करण्यात मदत करते. मिलिंदने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा विरोध पाहायला मिळाला आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनवर त्याने लिहिले की, व्हिम ब्लॅक, पुरुषांसाठीचे डिशवॉशिंग लिक्विड.

या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर मिलिंदची ही जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ही जाहिरात लिंग भेदभाव करते असा आक्षेप नेटकऱ्यांनी घेतला आहे. त्यामध्ये केवळ पुरुषांना (Men) लक्ष्य केले आहे.

त्यात मिलिंदने अशा प्रकारची जाहिरात करणे हे चुकीचे आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील मिलिंदच्या वेगवेगळ्या चित्रपटांवर (Movie) नेटकऱ्यांनी आक्षेप दर्शवला होता. एका युझर्सनं मिलिंदच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, भावा, आपल्याला अंघोळ करायची नाही. भांडी घासण्यामध्ये कसला आलाय भेदभाव....दुसऱ्यानं लिहिलं आहे की, काय मुर्खपणा आहे हा....

वीम कंपनीचे स्पष्टीकरण

दरम्यान, वीम कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. उत्पादन कंपनी आम्ही ब्लॅक पॅकबद्दल गंभीर नाही, परंतु ते पुरुषांच्या घरातील कामांबद्दल खूप गंभीर आहे!"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com