Fitness Mantra of Milind Soman: रोज 15 ते 20 मिनीटे वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करा

आपल्या फिटनेसमुळे एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिलींद सोमनचा फिटनेस मंत्रा
Perfect fitness mantra from Milind Soma
Perfect fitness mantra from Milind SomaDainik Gomantak
Published on
Updated on

मी फिटनेस टिकवण्यासाठी रोज 15 मिनीटे वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करतो. माझ्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे असं म्हणतोय आपल्या फिटनेसने वेगळी ओळख निर्माण करणारा मिलींद सोमन.

मिलींद सोमन म्हणतो की, जर तुम्ही तुमची फिटनेस जर्नी सुरु करणार असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. अतीव्यायाम किंवा शरीराला अतीताण दिला तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात.

तुम्ही जे करताय त्यात आणि तुमचं शरीर तुम्हाला जे संकेत देतं ते ऐकणं आणि विश्रांती घेणं याच्यात तुम्हाला समतोल साधता यायला हवा. मिलींद सोमन पुढे म्हणतो , आपण हे लक्षात ठेवायला हवं कि शरीराला दिलेला ताण हा तुम्हाला जखमी किंवा कायमस्वरुपी त्रासदायक ठरु शकतो.

आपल्या सगळ्यांंना माहित आहेच की, व्यायाम आणि फिटनेसच्या बाबतीत किती जागरुक आहे. मिलींद सोमन (Milind) त्याचं व्यायामाचं शेड्युल कधीही बिघडवत नाही. प्रत्येक ऋतुत किंवा अगदी प्रवासात असतानाही मिलींद सोमन त्याचं व्यायामाचं शेड्युल बिघडवत नाही.

सोशल मिडीयावर मिलींद सोमन बराच अॅक्टिव्ह असतो. विशेषत: इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचे व्हीडीओ तो शेअर असतो. 57 वर्षीय मिलींद सोमनला साेशल मिडीयावर लोक फॉलो करतात.

कुठल्याही अॅक्टर किंवा मॉडेलसाठी त्याचा फिटनेस अत्यंत महत्त्वाचा असतो. केवळ शारिरीकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही अत्यंत महत्त्वाचे असते. शरीर दिर्घकाळ सदृढ राहण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते.

Perfect fitness mantra from Milind Soma
IVF Treatment: IVF निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी...

एखाद्या दिवशी तुमचं शरीर व्यायामासाठी किंवा कुठलीही कृती करण्यासाठी तयार नसते. आपण जर जबरदस्ती केली तर शरीराला इजा होऊ शकते. अशा वेळी आपण हलका व्यायाम करायला हवा. त्यामुळे आपला त्या दिवसाचा व्यायाम पुर्ण होऊ शकतो.

मिलींद सोमनने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात त्याने 15 पुल- अप्स पुरे असं म्हटलेलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com