Mahima Chaudhry told the secret of the industry  Dainik Gomantak
मनोरंजन

महिमा चौधरीने बॉलिवूडची केली पोलखोल, काम देण्यापूर्वी...

दैनिक गोमन्तक

महिमा चौधरीने (Mahima Chaudhry) परदेस (Pardes) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परदेस गर्ल बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. मात्र, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. दरम्यान, महिमा चौधरीची एक मुलाखत सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यात तिने अभिनेत्रींसाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती बदल झाला आहे हे सांगितले आहे.

महिमा चौधरीच्या मते, आता अभिनेत्रींना पूर्वीपेक्षा चांगल्या भूमिका मिळतात आणि त्यांना चित्रपटात चांगली संधीही दिली जाते. महिमा चौधरी म्हणाली की, आता अभिनेत्रीला चांगले पैसे मिळतात, चांगले ब्रॅण्डही मिळतात आणि त्या पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली पदांवर आहे. या सगळ्याशिवाय आता अभिनेत्री पूर्वीपेक्षा जास्त काळ काम करू शकते.

वर्जिन अभिनेत्री पाहिजेत

पुढे बोलताना महिमाने बॉलिवूडची पोल खुली केली. ती म्हणाली की तुमच्या रिलेशनशिपचा पूर्वी कामावर परिणाम होत असे. जर एखादी अभिनेत्री एखाद्याला डेट करत असेल, तर लोक असे लिहायचे की ते फक्त कुमारी वर्जिन शोधत आहेत, जिने कोणालाही किस दिले नाही. जर एखादी अभिनेत्री कुणाला डेट करत असेल तर म्हणतात, अरे ती डेटिंग करत आहे. जर अभिनेत्रीचे लग्न झाले तर करिअर विसरा आणि जर मुलगा झाला तर करिअर पूर्णपणे संपले.

या विषयावर बोलताना महिमा चौधरी पुढे म्हणाली की आजकाल लोकांना अभिनेत्रीला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला आवडते. पूर्वी असे काही होत नव्हते. अभिनेत्रीला तिचे वैयक्तिक आयुष्य लपवावे लागायचे. महिमा म्हणाली की पूर्वी जर एखादी अभिनेत्री आईची भूमिका साकारत असती तर तिला लवकरच इतर कोणत्याही भूमिकेची ऑफर दिली जात नव्हती. अनेक अभिनेते पूर्वी त्यांचे नाते लपवत असत आणि जेव्हा त्यांचा चित्रपट रिलीज झाला तेव्हा बऱ्याच वर्षांनंतर त्यांना विवाहित असल्याची माहिती मिळत असे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT