The Fame Game Poster Insta/@karanjohar
मनोरंजन

माधुरी दीक्षितच्या 'फाइंडिंग अनामिका' या सिरीजचे नाव बदलले

करण जोहरच्या (Karan Johar) फाइंडिंग अनामिका (Finding Anamika) या सिरीजमध्ये माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

करण जोहरच्या (Karan Johar) फाइंडिंग अनामिका (Finding Anamika) या सिरीजमध्ये माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी या मालिकेचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. आता मात्र या सिरीजचे नाव बदलण्यात आले आहे. या सिरीजचे नाव आता द फेम गेम (The Fame Game) असे ठेवण्यात आले आहे. या सिरीजमध्ये माधुरी बॉलीवूड स्टार अनामिका आनंदची (Anamika Anand) भूमिका साकारणार असून ही सिरीज 25 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

नवीन नावाने सिरीजचे पोस्टर शेअर करताना करण जोहरने लिहिले की, 'प्रसिद्धी आणि स्टारडमच्या पडद्यामागे नेहमीच एक सत्य दडलेले असते. बॉलीवूड सुपरस्टार अनामिका आनंदच्या आयुष्यातील वास्तव काय आहे? त्याबद्दल जाणून घ्या. फेम गेम सिरीज 25 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर रिलीज होणार आहे."

पोस्टरमध्ये तुम्हाला माधुरी दीक्षित काहीशी नाराज लूकमध्ये दिसणार आहे. यामध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन आणि मुस्कान जाफरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिरीजमध्ये सुहासिनी मुळे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिरीजमध्ये तिच्या अनामिका या व्यक्तिरेखेबद्दल माधुरीने इंस्टाग्रामवर सांगितले होते की, तिचे जग एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे आहे. त्याची कथा अकथित आहे. पण आता ती तिची कहाणी घेऊन जगासमोर येत आहे.

सुपरस्टार अनामिकाच्या आयुष्यातील अनेक किस्से फेम गेममध्ये दाखवले जाणार आहेत. तिच्या कारकिर्दीतील अनेक चढ-उतार ती कशी फेस करते. फेम गेमची कथा श्री राव यांनी लिहिली असून तिचे दिग्दर्शन बेजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे.

या सिरीजमधून माधुरी तब्बल 2 वर्षांनंतर अभिनयात पुनरागमन करत आहे. 2019 मध्ये रिलीज झालेल्या कलंक या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. या चित्रपटात माधुरीसोबत संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन आणि कुणाल खेमू मुख्य भूमिकेत होते. एवढी उत्तम स्टारकास्ट असूनही या चित्रपटाने काही विशेष कामगिरी केली नव्हती. माधुरीच्या कामाचे आणि नृत्याचे खूप कौतुक झाले असले तरी या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता माधुरी फेम गेममध्ये दिसणार आहे. यादरम्यान माधूरी डान्स दिवाने या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT