Michelle Obama Dainik Gomantak
मनोरंजन

"प्रिय Michelle Obama...'', गीतकार जावेद अख्तरांची अमेरिकेच्या पूर्व फर्स्ट लेडीला साद

Javed Akhtar Appeal To Michelle Obama: "प्रिय मिशेल ओबामा, मी तुमचा क्रेझी फॅन नाही, तर भारतातील 77 वर्षांचा लेखक आणि कवी आहे..."

दैनिक गोमन्तक

Javed Akhtar Appeal To Michelle Obama: "प्रिय मिशेल ओबामा, मी तुमचा क्रेझी फॅन नाही, तर भारतातील 77 वर्षांचा लेखक आणि कवी आहे..." हे शब्द आहेत भारतातील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना त्यांनी या भावूक गोष्टी लिहिल्या आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी त्यांच्या द लाइट वी कॅरी दौऱ्याची घोषणा करण्यासाठी ट्विट केले होते. या ट्विटला उत्तर म्हणून गुरुवारी (6 ऑक्टोबर) बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांना भावनिक आवाहन केले. गीतकार अख्तर यांनी मिशेल ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये परतण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहे.

मिशेल यांच्या ट्विटवर भावूक ट्विट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी बुधवारी, 5 ऑक्टोबर रोजी एक ट्विट करुन त्यांच्या द लाइट वी कॅरी या दौऱ्याची घोषणा केली. या ट्विटला उत्तर देताना भारताचे गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी त्यांना भावनिक आवाहन केले. गीतकार अख्तर यांनी अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये परतण्याचा मार्ग शोधण्याचे आवाहन केले आहे.

अख्तर ट्विट करत म्हणाले की, "मॅडम कृपया माझे म्हणणे गांभीर्याने घ्या. केवळ अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला तुमची गरज आहे. तुम्ही या जबाबदारीपासून दूर जाऊ नका."

जावेद अख्तर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, "प्रिय मिशेल ओबामा, मी तुमचा चाहता नाही, तर भारतातील 77 वर्षांचा लेखक आणि कवी आहे. आशा आहे की, भारतीयांना माझे नाव माहित असेल.''

मिशेल यांची द लाइट वी कॅरी टूर

मिशेल ओबामा यांनी बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी तिच्या 'द लाइट वी कॅरी' टूरबद्दल ट्विट केले. यामध्ये त्यांनी माहिती दिली की, 'या दौऱ्यात मी माझ्या वैयक्तिक गोष्टी शेअर करणार आहे.' त्यांच्या दौऱ्यात वॉशिंग्टन डीसी, फिलाडेल्फिया, अटलांटा, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस यांचा समावेश असेल. त्यांचा दौरा एलेन डिजेनेरेस, गेल किंग, एलिझाबेथ अलेक्झांडर, कॉनन ओब्रायन यांसारख्या नामवंत व्यक्तींकडून वेगवेगळ्या राज्यांत होणार आहे.

शिवाय, जानेवारी 2017 मध्ये, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष पती बराक ओबामा यांची ओव्हल ऑफिसमधील दुसरी टर्म संपल्यानंतर मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊस सोडले. युनायटेड स्टेट्सच्या फर्स्ट लेडीचे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT