Google ने चीनला दिला मोठा झटका, बंद केली ही खास सेवा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Google: कोरोना काळापासूनच गुगल चीनमधून आपल्या सेवा कमी करत आहे.
Google
GoogleDainik Gomantak
Published on
Updated on

Google in China: कोरोना काळापासूनच गुगल चीनमधून आपल्या सेवा कमी करत आहे. या अनुषंगाने चीनने नुकतेच मोठे पाऊल उचलले होते. यातच आता गुगलने चीनमध्ये गुगल ट्रान्सलेट सेवा बंद केली आहे. याआधी, गुगलने आपल्या प्रोडक्ट्सचे मॅन्युफॅक्चरिंग चीनमधून इतर देशांमध्ये हलवले होते. या क्रमवारीत एक मोठे पाऊल उचलत गुगलने आपल्या पिक्सेल फोनच्या निर्मितीसाठी चीनऐवजी भारताला प्राधान्य दिले.

गुगलने चीनमध्ये ही सेवा बंद केली

गुगलने (Google) चीनमध्ये आपली 'गुगल ट्रान्सलेट' सेवा बंद केली आहे. Google भाषांतर ही Google ने चीनमध्ये (China) पुरवलेल्या काही सेवांपैकी एक होती. खरे तर, पाश्चात्य देशांच्या सोशल मीडिया कंपन्यांनी पुरवलेल्या बहुतांश सेवांवर चीनमध्ये बंदी आहे.

Google
'Google Pixel 7' लॉन्चिंगसह सुरू होणार 'Google Pixel' सीरीजची प्री बुकिंग

गुगलने ही माहिती दिली

Google Translate च्या स्मार्टफोन अ‍ॅपवर आणि चीनमधील वेबसाइटवर, यूजर्संना एक साधा 'सर्च बार' आणि 'लिंक' दिसते, ज्यावर क्लिक केल्यावर ते हाँगकाँगमध्ये उपलब्ध असलेल्या कंपनीच्या वेबपेजवर जातात. या वेबपेजवर चीनमध्ये बंदी आहे. चीनमधील अनेक यूजर्संनी त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमध्ये शनिवारपासून 'गुगल ट्रान्सलेट' सेवा वापरण्यास असमर्थ असल्याची तक्रार केली आहे. गुगलच्या क्रोम ब्राउझरमध्ये उपलब्ध असलेले ट्रान्सलेशन फीचर आता चीनमध्ये काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Google
Google ने उचलले 'या' अ‍ॅपसाठी मोठे पाऊल, वाचा एका क्लिकवर

त्यामुळे सेवा ठप्प झाली

गुगलने एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, चीनमध्ये 'कमी वापर' झाल्यामुळे 'गुगल ट्रान्सलेट' सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, चीनमधील किती युजर्सनी 'गुगल ट्रान्सलेट' सेवा वापरली हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com