Poonam Pandey dainikgomantak
मनोरंजन

Poonam Pandey : माझा पती मला दारू पिऊन मारायचा

Poonam Pandey in Lock Upp: दारू पिऊन बेदम मारहाण करायचा नवरा, पूनम पांडे यांनी खुलासा केला

दैनिक गोमन्तक

Poonam Pandey in Lock Upp: कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी पूनम पांडे सध्या कंगना राणौतच्या तुरुंगात कैद आहे. 'लॉकअप' (Lock Upp) या शोमध्ये पूनम पांडे हिने तिच्या लग्नाच्या आठवणींची पाने मागे सारताना माजी पती सॅम बाबत काही खुलासे केले आहेत. जे आपल्याला धक्का देणार आहेत. यावेळी पूनम पांडे हिने तिचा पती तिला दारू पिऊन बेदम मारहाण करायचा असं म्हटलं आहे. तसेच त्याच्या मारहाणीमुळे तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचंही समोर आलं होतं असंही तिने म्हटलं आहे. तर सॅम हा खूप कंट्रोल ठेवणारा होता. त्यांने तिला दुसऱ्या कोणत्याही खोलीत एकटे राहू दिले नाही. तर तिला घरी फोनही वापरण्याची परवानगी दिली नाही. (Lock Upp's Poonam Pandey reveals she suffered brain hemorrhage after ex-husband Sam Bombay beat)

'लॉकअप' (Lock Upp) या शोमध्ये करणवीर बोहराने पूनम पांडेला, तुझे सॅम बॉम्बेवर (Sam Bombay) खरे प्रेम आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पूनमने (Poonam Pandey) तिच्या आयुष्यातील न ऐकलेली रहस्ये उघड केली. त्यवेळी तिने सॅम बॉम्बेच्या दारूच्या (Alcohol) व्यसनाबद्दल ती सांगितले. तर बोहराच्या प्रश्नाला उत्तर देताना पूनम म्हणाली, होय, मला सॅम आवडत होता. मी अजूनही त्याचा तिरस्कार करत नाही. मला फक्त तो आवडत नाही. पण हे त्यांच्याबाबतीत घडावे असे कोणालाच वाटणार नाही. कोणाला मारायला आवडेल?

माझे घर चार मजली असून ते एक मोठे घर (House) आहे. त्यात एक खाजगी बाग आहे. एक खाजगी टेरेस आहे. माझ्याकडे सर्व काही आहे. मी जर एका खोलीत असायचे तर मला तू त्या खोलीत का होतीस असा प्रश्न केला जायचा. तर तो ज्या खोलीत असेल त्याच खोलीत मी त्यांच्यासोबत असावे असे त्याला वाटायचे. पण जेंव्हा मी त्याला सांगायचे की, मला स्वतःसोबत थोडा वेळ हवा आहे. मोकळ्या हवेत गच्चीवर जायचं आहे. त्यवेळी मला ते तसं करण्याची परवानगी देत नसत.

मला माझा फोन (Phone) कुठेही नेण्याची परवानगी नव्हती. मला माझ्याच घरात माझ्या फोनला हात लावण्याची परवानगी नव्हती. जर मी माझ्या कुत्र्यावर प्रेम केलं आणि त्याच्याबरोबर झोपले तर तो मला म्हणायचा की, तू माझ्यापेक्षा जास्त तुझ्या कुत्र्यावर प्रेम करतेस. हे कसलं बोलणं? कुत्र्यावर (Dog) प्रेम केल्याबद्दल मला मारहाण का? हे ब्रेन हॅमरेजचे (Brain Hemorrhage) कारण आहे का? मात्र हे माझ्या बाबतीत घडलं.

पण मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे. गेल्या 4 वर्षांपासून हा प्रकार सुरू असून सॅमने मला फक्त 1 वेळाच मारलेलं नाही, माझ्या मेंदूला झालेली दुखापत अजून बरी झालेली नाही. याच कारण तो मला त्याच जागेवर वारंवार मारायचा.

हे सगळं बाजूला सावरत मी, मेकअप करून ग्लॉस लावून लोकांसमोर हसत जात होतो. मी त्याच्या समोर खूप मस्त असायचो. दरम्यान, पायल रोहतगीने मला विचारले की, तो त्याच्या असुरक्षिततेमुळे तुला मारहाण करतो का? उत्तर देताना पूनम म्हणाली - जर एखादी व्यक्ती सकाळी 10 वाजल्यापासून रात्रीपर्यंत मद्यपान करत असेल तर रात्री तुम्हाला कोणीही वाचवणार नाही. कर्मचारी घाबरायचे, ते निघून जायचे. पण आता ती विभक्त झाली आहे. आणि आता तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT