Jhund: अमिताभ बच्चन यांच्या फुटबॉल संघाची 'विजयी झुंड'

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांच्या झुंड (Jhund) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते
Amitabh Bachchan new film Jhund Team
Amitabh Bachchan new film Jhund TeamTwitte
Published on
Updated on

चित्रपट - झुंड

कलाकार - अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर

दिग्दर्शक - नागराज मंजुळे

रेटिंग - 3.5

मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे चाहते त्यांच्या झुंड (Jhund) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे. स्पोर्ट्सवर बनलेल्या चित्रपटाची कथा काय सांगते आणि हा चित्रपट लोकांच्या मनात घर करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी उद्या हा चित्रपट सिनेमागृहात रिलिज होत आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे सैराट या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सैराटनंतर चित्रपटसृष्टीचा एक ओळखीचा चेहरा बनलेल्या अमिताभ यांच्यासह रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरही यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरणार की नाही.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण त्यांची व्यक्तिरेखा प्रत्येक चित्रपटात काहीतरी नवीन सांगून जाते. स्लम सॉकर एनजीओ चालवणाऱ्या विजय बारसे यांची जीवनकथा म्हणजे झूंड चित्रपट. या चित्रपटात अमिताभ बच्चन विजयच्या भूमिकेत आहेत. हे तेच नाव आहे जे ७० च्या दशकातील प्रत्येक सुपरहिट चित्रपटात असायचे. विजय हे एका महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. काही झोपडपट्टीतील मुले जे अंमली पदार्थ आणि चोरीच्या वाईट सवयीमुळे बिघली आहेत त्यांना योग्य मार्ग दाखण्याचा निश्चय विजय यांनी केला आहे. ज्यासाठी त्याचा संघर्ष सुरू होतो. या मुलांना वाईट सवयीपासून दूर करण्यासाठी तो भारताचा राष्ट्रीय फुटबॉल संघ तयार करेल असा विजयचा निर्धार आहे.

Amitabh Bachchan new film Jhund Team
गोव्याच्या किनाऱ्यावर निया शर्माने साजरा केला आईचा वाढदिवस

मग या मुलांना फुटबॉल शिकवून संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्याचा चांगला परिणाम मुलांवरही दिसून येतो. ती मुलं सगळं विसरून त्यांची मेहनत आणि फुटबॉलची आवड वाढवतात, पण काही लोक अमिताभ यांच्या (विजय) या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थिती करून विरोध करतात. यामुळे कथेत अनेक चढ-उतार आहेत. या आव्हानांच्या दरम्यान, अमिताभचा हा संघ राष्ट्रीय फुटबॉल संघ बनू शकतो का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.

अमिताभ बच्चन यांनी साकारलेली विजय दीनानाथ चौहान ही एक हॉट विनोदी आणि दमदार व्यक्तीची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. इथे अमिताभचे पात्र पुन्हा एकदा या नावाने दिसले पण या पात्रात उत्साह आहे पण तो एकदम वेगळा आहे. बिग बींनी या चित्रपटातही उत्तम अभिनय केला आहे, त्यांचा अभिनय नेहमीच अतुलनीय राहिला आहे. त्यांचे संवाद लोकांना प्रभावित करणारे असतात. चित्रपटात इतरही अनेक कलाकार आहेत जे या मेगास्टार सोबत दिसणार आहे. सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर काही मिनिटांसाठी पडद्यावर दिसले पण त्यांनी आपली छाप सोडली आहे.

Amitabh Bachchan new film Jhund Team
गुलाबी ओठांची चेष्टा करणाऱ्यांची टायगर श्रॉफने केली बोलती बंद

सर्वांची मेहनत चित्रपटात पाहायला मिळाली आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटातून सामाजिक प्रश्न मांडला आहे जो खूप प्रभावी आहे.चित्रपटातील भावना, विनोद, सामाजिक अडथळे असे अनेक ट्विस्ट चित्रपटाला मनोरंजक बनवतात. ज्यांना स्पोर्ट्स चित्रपटांची खरी आवड आहे आणि बिग बींचे चाहते आहेत त्यांच्यासाठी हा चित्रपट एकदम खास असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com