Kriti Sanon in Mimi movie Twitter/@NGE_Talent
मनोरंजन

कृती सॅनॉन 'या' चित्रपटात बनणार सरोगेट मदर

मनोरंजन उद्योगाचा सर्वाधिक परिणाम कोरोना (Covid19)साथीने झाला आहे. सिनेमा हॉल (Cinema Hall) बंद पडल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

दैनिक गोमन्तक

मनोरंजन उद्योगाचा सर्वाधिक परिणाम कोरोना (Covid19)साथीने झाला आहे. सिनेमा हॉल (Cinema Hall) बंद पडल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता कृती सॅनॉनचा (Kriti Sanon) फिल्म 'मिमी' (Mimi) हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आज कृतीने चित्रपटाचा आपला पहिला लूक शेअर केला आहे.कृतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कृती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना, तिने लिहिले- या जुलैमध्ये सामान्य लोकांकडून विलक्षण गोष्टींची अपेक्षा करा. कृतीच्या या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी आणि त्यांचे फॅन्स कमेंट करत आहेत.(Kriti Sanon shares her first look from Mimi film)

श्रद्धा नाईकने कमेंट केले - मी यासाठी खूप उत्साही आहे. दुसरीकडे, कृतीची बहीण नूपूरने लिहिले - हे सर्वोत्कृष्ट होणार आहे. त्याच वेळी, कृतीचे चाहते लिहित आहेत, मीमीची वाट पाहू शकत नाही. कृतीची ही पोस्ट अडीच लाखाहून अधिक लोकांना आवडली आहे.कृती सॅनॉनच्या 'मिमी' चित्रपटाविषयी बोलताना ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. कृती एका छोट्याशा खेड्यातील असून अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहणार्‍या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. यादरम्यान ती एका प्रेमी युगलांना भेटते आणि सरोगेट आई बनण्याचा निर्णय घेते. या निर्णयानंतर तिच्या आयुष्यात कोणते बदल घडून येतील यासाठी या चित्रपटाची वाट पाहावी लागेल.

पंकज त्रिपाठी मिमीमध्ये कृतीसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. कृती आणि पंकजने लुका छुपी आणि बरेली की बर्फीमध्ये एकत्र काम केले आहे. लुका छुपी या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

कृती सॅनॉन लवकरच बच्चन पांडे अक्षय कुमारसोबत चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती वरुण धवन याच्यासोबत भेड़िया, गणपत टायगर श्रॉफ आणि प्रभास सोबत आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. सीतेच्या अवतारात कृतीला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच कृती या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT