Koffee With Karan 7 News
Koffee With Karan 7 News Dainik Gomantak
मनोरंजन

Koffee With Karan 7: आमिर खानला बॉलिवूड पार्ट्या का आवडत नाहीत?

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतो. बी-टाऊनमध्ये जिथे रोज पार्ट्या होतच असतात. पण आमिर खान लवकर कोणत्याही पार्टीत जॉईन होत नाही. करण जोहरने आमिरला त्याच्या 50 व्या वाढदिवशी आमंत्रित केले होते. त्याने देखील हजेरी लावली होती, परंतु कदाचित आमिरला त्याची पार्टी फारशी आवडली नाही.

करण जोहरच्या शो कॉफी विथ करण (Koffee With Karan) 7 च्या 5 व्या एपिसोडमध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान कॉफी सोफ्यावर दिसले होते. या शोमध्ये तिघांनीही खूप धमाल केली. दरम्यान, करीना कपूर म्हणाली की, करण म्हणतो की, आमिर खूप कंटाळवाणा आहे. तसेच करणने आमिरला 'पार्टी पूपर' म्हटले होते. हे ऐकून आमिर खानने उत्तर दिले की, पार्टीमध्ये खूप लाऊड ​​म्युझिक असतो जे त्याला आवडत नाही.

करण आमिरबद्दल सांगतो की, तो संगीतापासून दूर पळतो आणि पार्टीत एक-दोन लोकांसबोत गप्पा मारतो. करीना हे मान्य करते. करणने असेही सांगितले की, त्याने आमिर खानसोबत त्याच्या पार्टीमध्ये दर्जेदार वेळ घालवला आणि खूप बोलले, पण तरीही आमिरला शेकडो लोकांची पार्टी सोडून पळून जायचे होते. मात्र, जेव्हा करणने आमिरला 'पार्टी पूपर' म्हटले तेव्हा आमिरने याला असहमती देत ​​पार्ट्या का आवडत नाहीत हे सांगितले. त्याने सांगितले की तो अजिबात कंटाळवाणा नाही आणि तो पार्टीचा पूपरही नाही. तो सांगतो की, पार्ट्यांमध्ये इतकं जोरात संगीत असतं की, कोणालाच कोणाशी बोलता येत नाही.

यानंतर तो करण जोहरच्या (Karan Johar) 50 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल बोलू लागतो आणि म्हणतो की तो एका जागी बसून सर्व काही पाहत होता. तो म्हणाला, “मोठ्या आवाजात संगीत सुरू होते आणि कोणीही नाचत नव्हते. सर्व माणसे एकमेकांशी ओरडत बोलत होती."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT