Marry Christmas Poster Dainik Gomantak
मनोरंजन

Marry Christmas Poster : विजय - कतरिनाच्या 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसणार जुनी मुंबई, चित्रपटाचं पोस्टर एकदा पाहाच

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या आगामी मेरी ख्रिसमस चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.

Rahul sadolikar

सध्या सोशल मिडीयावर अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतूपती यांची चर्चा सुरू आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' 2023 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रेक्षक आणखीनच उत्सुक आहेत कारण कतरिना आणि विजय पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. 

सगळ्यांना बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर टीमने चित्रपटाची रिलीज डेट कधीतरी जाहीर केली. विजय आणि कतरिनाने सोशल मीडियावर एका नवीन पोस्टरसह तारखेची घोषणा केली आहे.

रिलीज डेट

यापूर्वी हा चित्रपट 2022 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार होता. मात्र नंतर तो 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आला. आता हा चित्रपट 15 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांनी दोन पोस्टर लाँच केले, एक हिंदीमध्ये आणि दुसरे तमिळमध्ये. दोन्ही पोस्टरमध्ये कतरिना आणि विजय दिसत आहेत आणि सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. नवीन पोस्टर विंटेज वाइब्स देत आहे. 

पोस्टरवर जुनी मुंबई

हिंदी पोस्टर पाहता, चित्रपटात जुनी बॉम्बे पाहायला मिळेल असं दिसतंय. पोस्टरवर 'जेवढी गडद रात्र, तितकीच चांगली सकाळ' अशी टॅगलाइन लिहिली आहे. कतरिनाने पोस्टर शेअर करत लिहिले, 'आम्ही ख्रिसमसच्या सेलिब्रेशनच प्रतीक्षा खूप ताणवणार नाही. यासाठीच चित्रपट ख्रिसमसआधीच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. मेरी ख्रिसमस 15 डिसेंबर 2023 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

दिग्गज कलाकार करणार काम

हिंदी वर्जनमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिन्नू आनंद यांच्याही भूमिका आहेत, तर तमिळ आवृत्तीमध्ये राधिका सरथकुमार, शण्मुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्या भूमिका आहेत.

अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे कॅमिओमध्ये दिसणार आहेत. अहवालानुसार, क्राईम थ्रिलर एका दुर्दैवी दिवसाभोवती फिरेल जो कतरिना आणि विजयच्या जगाला उलथून टाकेल. नाताळच्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका घटनेवरची ही कथा आहे.

कतरिनाची उत्सुकता

याआधी 'पिंकविला'शी बोलताना कतरिनाने या चित्रपटाविषयीची उत्सुकता व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, 'फोन भूत नंतर विजयसोबत श्रीराम राघवनचा मेरी ख्रिसमस आहे. लवकरच येत आहे. चित्रपट जबरदस्त आहे. श्रीराम सर माझे आवडते दिग्दर्शक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: सत्य न जाणता ढवळीकरांवर आरोप करू नका! बांदोडा सरपंचांचा पाटकरांना सल्ला, मतांचा घोळ झाल्याच्या दाव्याला उत्तर

Goa: जिल्हा न्यायालयात आजी-माजी खासदार-आमदारांवर 22 प्रकरणे, हायकोर्टातही 2 खटले प्रलंबित

Goa healthcare policy: महागडे उपचार आता सर्वांसाठी परवडणार; दुर्मिळ आजारांवरील औषधांसाठी राज्यात 'अभिनव किंमत' धोरण राबवण्याची सरकारची घोषणा

Goa khazan Land Regularisation: आता खाजन जमिनीतील बांधकामे होणार नियमित, 2011 अधिसूचनेपूर्वीची बांधकामे कायदेशीर

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलाचा तिढा काही केल्या सुटेना, गृहमंत्री शहांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

SCROLL FOR NEXT