Film Releasing in November Dainik Gomantak
मनोरंजन

Film Releasing in November: जान्हवी, कॅटरिना, हुमा, सोनाक्षी यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार

नोव्हेंबरमध्ये 'दृष्यम 2', 'भेडिया', 'यशोदा', 'मोनिका ओ माय डार्लिंग' हे चित्रपटही रीलीज होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Film Releasing in November: नोव्हेंबर महिना चित्रपट रसिकांसाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात 8 महत्वाचे चित्रपट रीलीज होत आहेत. विशेष म्हणजे, कॅटरिना कैफ, जान्हवी कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचे चित्रपट एकाच दिवशी रीलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर या अभिनेत्रींमधील फाईट रंगणार आहे.

(Katrina Kaif Janhvi Kapoor Sonakshi Sinha Huma Qureshi)

कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा 'फोन भूत' 4 नोव्हेंबर रोजी रीलीज होणार आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा यांचा सोशल कॉमेडी असलेला चित्रपट 'डबल एक्सएल' 4 नोव्हेंबर रोजीच रीलीज होत आहे. तसेच जान्हवी कपुरचा 'मिली' 4 नोव्हेंबरला कॅटरिना आणि सोनाक्षी-हुमा यांच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी रीलीज होत आहे.

राजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे आणि राधिका मदान यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग' 11 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. साऊथ सुपरस्टार समंथा रूथ प्रभू हिचा 'यशोदा' हा चित्रपट हिंदी, कन्नड़ मल्याळम आणि तमिळ भाषेत 11 नोव्हेंबर रोजीच रीलीज होणार आहे. तर अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईराणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'ऊंचाई' 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.

आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी रीलीज होणार आहे तो म्हणजे वरूण धवनचा 'भेडिया.' याशिवाय अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'दृष्यम 2' 18 नोव्हेंबर रोजी रीलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT