Bharti Singh-Harsh Drugs Case: कॉमेडियन भारती सिंग, हर्ष यांच्याविरोधात NCB चे 200 पानी आरोपपत्र

दाम्पत्याच्या अडचणी वाढणार; सध्या दोघेही जामिनावर
Bharti Singh-Harsh Drugs Case
Bharti Singh-Harsh Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Bharti Singh-Harsh Drugs Case: अभिनेता सुशांत सिंग रजपुतच्या मृत्यूनंतर एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. यात कॉमेडीयन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचेही नाव होते. आता नार्कोटिक्स क्राईम ब्युरो (एनसीबी) ने या दाम्पत्याविरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

Bharti Singh-Harsh Drugs Case
Fighter Movie Release Date: हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ची रीलीज डेट घोषित

त्यामुळे आता या दोघांविरोधात लवकरच खटल्याला सुरवात होईल. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत.

21 नोव्हेंबर 2020 रोजी एनसीबीने भारती आणि हर्ष यांच्या प्रॉडक्शन हाऊससह निवासस्थानी छापे टाकले होते. यात 86.5 ग्रॅम गांजा आढळून आला होता. त्यानंतर या दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर दाम्पत्याला न्यायालयाने प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिन दिला होता.

Bharti Singh-Harsh Drugs Case
Kartik Aaryan: कार्तिकचा 'फ्रेडी' थेट 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रीलीज

एनसीबीने तेव्हा न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, त्यात दावा केला होता की, या दाम्पत्यास तपास संस्थांची बाजू न ऐकताच जामिन दिला आहे. एनसीबीने न्यायालयाच्या आदेशाला वाईट म्हटले होते.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेकजण ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असल्याचे समोर आले होते. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनाही एनसीबीने अटक केली होती. तसेच अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचीही चौकशी झाली होती. अभिनेत्री दीपिका पदुकोन हीचीदेखील चौकश याच वेळी भारती सिंग आणि हर्ष यांचेही नाव समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com