Kartik Aaryan Dainik Go0mantak
मनोरंजन

Kartik Aaryan: कार्तिकचा 'फ्रेडी' थेट 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रीलीज

कार्तिक म्हणाला, प्रेक्षकांना माझा नवा अवतार आवडेल अशी आशा

गोमन्तक डिजिटल टीम

Kartik Aaryan: अभिनेता कार्तिक आर्यन याचा आगामी चित्रपट 'फ्रेडी' आता चित्रपटगृहात रीलीज न होता, थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे.

अर्थात अद्याप या चित्रपटाची रीलीज डेट जाहीर झालेला नाही, केवळ हा चित्रपट सिनेमागृहात रीलीज होणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. हा चित्रपट पुढील वर्षात डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलीज होणार आहे.

कार्तिकने याबाबत म्हटले आहे की, 'फ्रेडी'सारख्या चित्रपटाचा भाग बनणे माझ्यासाठी भाग्याचे आहे. या चित्रपटासारखी कहाणी मी यापुर्वी कधीही ऐकलेली वा पाहिलेली नाही. याचित्रपटाने मला माझ्यासोबत प्रयोग करण्याची संधी दिली. डिस्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट कधी रीलीज होईल, याची मला खूप उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांना माझा नवा अवतार आवडेल, अशी आशा आहे. फ्रेडी'चे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असणार आहे.

यात कार्तिकसोबत अलाया एफ. ही मुख्य भुमिकेत आहे. अलायाने मध्यंतरी कार्तिकसोबत डेटिंगबाबत वक्तव्य केले होते. एके सकाळी मी झोपेतून उठले आणि मी कार्तिकसोबत बेडवर असेन, तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे अलाया म्हणली होती.

दरम्यान, कार्तिकच्या वर्कफ्रंटबाबत बोलयाचे तर आगामी काळात तो 'सत्यप्रेम की कथा' मध्ये कियारा आडवाणीसोबत दिसणार आहे, याशिवाय 'आशिकी 3', 'शहजादा', 'कॅप्टन इंडिया' हे चित्रपटही त्याच्याकडे आहेत. कार्तिक आणि कियारा आडवाणी यांचा 'भूल भुलैय्या 2' या वर्षी सुपरहिट ठरला आहे. 'दोस्ताना 2' मधील भुमिकेवरून करन जोहरशी वाद होऊनही कार्तिकने स्वतःचे करीयर चांगले सावरले आहे. 'दोस्ताना 2' त्याने सोडला आहे. पण इतर चांगले चित्रपट त्याच्या हातात आहेत. एकीकडे अक्षयकुमार, अजय देवगण यांचे चित्रपट अयशस्वी होत असताना मात्र कार्तिकचे चित्रपट मात्र बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला कमवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT