Salman खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर; आजारातून झाला रिकव्हर, लवकरच...

सलमान अचानक आजारी पडल्यानंतर मागील वीकेंडचा एपिसोड करण जोहरने होस्ट केला होता.
Bollywood actor Salman Khan
Bollywood actor Salman KhanDainik Gomantak
Published on
Updated on

सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडचा दबंग खान आता डेंग्यूमधून पूर्णपणे बरा झाला आहे. यामुळे लवकरच तो बिग बॉसच्या (Bigg Boss) वीकेंड वॉरमध्येही दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान अचानक आजारी पडल्यानंतर मागील वीकेंडचा एपिसोड करण जोहरने होस्ट केला होता. यादरम्यान त्यांनी शोच्या स्पर्धकांचा क्लासही घेतला होता.

Bollywood actor Salman Khan
Taapsee Pannu Viral Video: असे काय घडले की तापसी पन्नु पुन्हा फोटोग्राफर्सवर संतापली

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. नुकताच तो आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही पोहोचला होता. सलमान गुरुवारी बिग बॉसच्या एपिसोडचे शूटिंग करणार आहे. या एपिसोडमध्ये 'फोन भूत'ची टीम त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसेल. 'फोन भूत'मध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर दिसणार आहेत.

लग्नानंतर कतरिना पहिल्यांदाच सलमान खानसोबत पडद्यावर दिसणार आहे. सलमान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. त्यांचे अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. सलमान लवकरच 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 'हाऊफुल 4' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद सामजी दिग्दर्शित करत आहेत.

Bollywood actor Salman Khan
लोकप्रिय दिग्दर्शक 'Esmayeel Shroff' यांचे निधन

सलमानचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तसेच, मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध कतरिना कैफही दिसणार आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com