Shabana Azmi and Kangana Ranaut hijab reaction Dainik Goman
मनोरंजन

Hijab Row: कंगना राणौतच्या प्रतिक्रियेवर शबाना आझमींचे प्रश्नार्थक उत्तर

पंगा गर्लची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

कर्नाटकात (Karnataka) सध्या सुरू असलेला हिजाबचा वाद (Hijab Row) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या सतत वाढत असलेल्या वादावर बॉलीवूडकडूनही (Bollywood) सतत प्रतिक्रिया येत आहेत. गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar), ऋचा चढ्ढा (Richa Chadha) यांनी या विषयावर तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर, कंगना राणौतने (Kangana Ranaut) सोशल मीडियावर या प्रकरणावर आपले मत मांडले. हिजाबचे समर्थन करणाऱ्यांना तिने सल्ला दिला आहे, या प्रकरणावर पंगा गर्लची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कंगना राणौतने हिजाब वादावर दोन फोटो शेअर करत आपले मत व्यक्त केले. पंगा क्वीनने लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये 1973 मधील इराणी महिला बिकिनीमध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये एक महिला बुरखा घातलेली दिसत आहे. या फोटोसा 1973 चा इराण आणि आताचा इराण असे कॅप्शन देण्यात आले आहे.

'हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता फिरून दाखवा... स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका.' असे मत कंगनाने व्यक्त केले.

कंगनाची पोस्ट शेअर करताना शबाना आझमी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

'मी चुकीचे आहे का ते मला सांगा पण अफगाणिस्तान एक धार्मिक राज्य आहे आणि जेव्हा मी शेवटचे चेक केले तेव्हा मला आढळले की भारत एक धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे?' असे प्रश्नार्थक मत शबाना आझमी यांनी व्यक्त केले.

जावेद अख्तर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले

'मी कधीही हिजाब किंवा बुरख्याच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. परंतु त्याच वेळी मुलींच्या एका लहान गटाला धमकावण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार्‍या या गुंडांबद्दल माझ्याकडे तीव्र तिरस्कारापेक्षा काहीही नाही. त्यांच्या मते हा पुरुषार्थ आहे का? हे खेदजनक आहे.' असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.

काय आहे प्रकरण

कर्नाटकातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाबबाबत गदारोळ सुरू आहे. दरम्यान, अलीकडेच कर्नाटकातील एका कॉलेजचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा जमाव मुलीकडे येतो. मुलीसमोर 'जय श्री राम'चा नारा लावला जातो, तर ती मुलगीही 'अल्लाहू अकबर'चा नारा देत उत्तर देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT