Karnataka Hijab Row: 'स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका'

कंगना रणावतने (Kangana Ranaut) देशात सुरु असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे बोलते. आता हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील उडुपी ज्युनिअर कॉलेजमध्ये हिजाबबाबत सुरु झालेला वाद वाढतच चालला आहे. आता या वादाने राजकीय रुप धारण केले आहे. यावर सर्वच राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूड स्टार्सही यात मागे नाहीत. आत्तापर्यंत रिचा चड्डा, जावेद अख्तर यांसारख्या अनेक स्टार्सनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता या एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द 'पंगा गर्ल' कंगना रणावतही (Kangana Ranaut) सामील झाली आहे. कंगना देशात सुरु असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे बोलते. आता हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Kangana Ranaut Has Reacted To The Controversy Over The Hijab)

वास्तविक, कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट आहे. या पोस्टमध्ये बदलत्या इराणची झलक दाखवली आहे. पहिल्या फोटो 1997 मध्ये इराणी महिला बिकिनीमध्ये दिसत आहेत आणि आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत. या फोटोसोबत 1973 चा इराण आणि आताचा इराण असे लिहिले आहे. तिच्या इन्स्टा स्टोरीवर आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनानेही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. कंगनाने म्हटल की, 'हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात (Afghanistan) बुरखा न घालून दाखवा... स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका.'

Kangana Ranaut
हिजाबच्या वादात तालिबानची एन्ट्री, निषेध करणाऱ्या मुलींना दिला पाठिंबा

दरम्यान, कंगनाच्या आधी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देणारे ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटलं होत की, 'मी कधीच हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही त्या पाठीशी उभा आहे, त्याचवेळी मुलींच्या त्या लहान गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचा मी निषेध करतो. हे त्यांचे "पुरुषत्व" आहे का? खेदाची गोष्ट आहे.'

त्याचवेळी ऋचा चढ्ढा (Richa Chadha) यांनी ट्विट करुन म्हटलं की, 'तुमच्या मुलांची प्रगती चांगल्या पद्धतीने करा. एकाद्या विद्यार्थिनीवर भ्याडांच्या झुंडीने हल्ला केला जात आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येत्या काही वर्षांत हे सर्व बेरोजगार, हताश आणि गरीब होतील. अशांबद्दल सहानुभूती नाही, मोक्ष नाही. अशा घटनांवर मी थुंकते.’

संपूर्ण वाद जाणून घ्या?

या प्रकरणाची सुरुवात कर्नाटकातील (Karnataka) उडुपीमधील एका महाविद्यालयातून झाली. जिथे जानेवारी महिन्यात काही विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात आल्या तेव्हा त्यांना वर्गात प्रवेश दिला गेला नाही. याच कारणामुळे एका विद्यार्थिनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, कर्नाटकातील एका कॉलेजचा व्हिडिओही सोशल मीडियावरुन व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते, तेव्हा काही मुले जय श्री रामच्या घोषणा देऊ लागतात. त्याचवेळी मुलगी अल्ला हो अकबरची घोषणा देत उत्तर देते. या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com